• महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं मित्र परिवारचे सहसंयोजक राजेंद्र पचारे यांचे कला क्षेत्रात पदार्पण!
• अनेकांनी केले पचारे यांचे अभिनंदन!
सुवर्ण भारत:किरण घाटे(विशेष प्रतिनिधी)
शालेय जीवनापासून कला क्षेत्रात अमाप आवड असणारे महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं मित्र परिवारचे सहसंयोजक तथा चंद्रपूर जिल्ह्यातील महसूल विभागातील सेवानिवृत्त मंडळ अधिकारी राजेंद्र पचारे यांनी नुकतीच ज्ञानदिप ॲक्टींग अकादमीची निर्मिती केली असल्याचे काल त्यांनी राजूरा मुक्कामी यांनी या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.
गेल्या काही वर्षांपासून आपले हे स्वप्न होते आज ते पूर्ण झाले असल्याचे ते म्हणाले.
आपणांस महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी तथा कला क्षेत्रातील जेष्ठ कलावंतांचे भरीव सहकार्य मिळत आहे.
निश्चित आपण यात प्रगतीच्या दिशेने वाटचाल करु असे पचारे एका मुलाखत दरम्यान म्हणाले .
महसूल विभाग ते कला क्षेत्रात पदार्पण करण्या पर्यंत त्यांचा हा प्रवास असून राजेंद्र पचारे यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.
महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं मित्र परिवारचे संयोजक सेवानिवृत्त नायब तहसिलदार पुरुषोत्तम कोमलवार, सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे, अधिवक्ता मेघा धोटे, मुख्य संयोजिका रंज्जू दिलीप मोडक सहसंयोजिका नलिनी आडपवार या शिवाय प्रदीप जूमडे, किरण घाटे, शंकर चव्हाण, विरेंद्र मडावी, अधिवक्ता पुनम वाघमारे, लोकहितचे दत्तात्रय समर्थ, युवा व्यापारी नितीन लोणारे, अभियंता किशोर निखार, सुपरिचित कवयित्री शैला चिमड्यालवार, वैजयंती गहुकर,कु.मंगल मिसाळ, महिला पत्रकार कु.स्नेहा मडावी, सुनिल रामटेके, चंदा कामडी, अल्का सदावर्ते पत्रकार रामदास हेमके, प्रविण वाघे आदिंनी पचारे यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व शुभकामना दिल्या आहेत.