⬜🔲बहरला मधुमास🔲⬜
सुवर्ण भारत: किरण घाटे (विशेष प्रतिनिधी)
⬜🔲बहरला मधुमास
सुगंध दरवळला,
पानाफुलांनी पृथ्वीवर
नवा साज चढवला.(१)
भुंगे गुणगुणूनी
फुलांशी बोलतसे,
अवनी आनंदाने
नटून हसत असे. (२)
झुळूक वाऱ्याची
छेडी मनाच्या तारा,
आनंदाच्या भरात
ना सापडे थारा.(३)
चैतन्याचे वारे
सभोवती वाहे,
मखमली स्पर्शात
मन नाहू पाहे . (४)
निसर्गाचा सोहळा
तारुण्याची गोडी ,
जीवनी मधुरतेचा
नवा सुर जोडी.(५)
⬜🔲वैशाली राऊत🔲⬜
⬜🔲 सहज सुचलं सदस्य नागपूर