• बियाणी नगर उद्यान व वाघोबा बहुद्देशीय सामाजिक संस्था ठरले विजेते
•
1 लक्ष रुपयांचे रोख बक्षीस व सौंदर्यीकरणास मिळणार प्रत्येकी 11 लक्ष
सुवर्ण भारत:शंकर महाकाली (संपादक)
चंद्रपूर:चंद्रपूर महानगरपालिके तर्फे15 सप्टेंबर ते 25 ऑक्टोबर दरम्यान घेण्यात आलेल्या ” सुंदर माझे उद्यान ” व ” सुंदर माझी ओपन स्पेस स्पर्धेचे विजेते घोषित करण्यात आले असुन तुकूम येथील बियाणी नगर उद्यानास 1 लक्ष व सुंदर माझी ओपन स्पेस स्पर्धेत बाबुपेठ येथील वाघोबा बहुद्देशीय सामाजिक संस्थेस 1 लक्ष रुपयांचे प्रथम पारितोषिक प्राप्त झाले आहे. सोबतच या दोन्ही संथांना 11 लक्ष रुपयांची विकास व सौंदर्यीकरणाची कामेही त्यांच्या परिसरात करता येणार आहे. त्रयस्थ परीक्षकांद्वारे करण्यात आलेल्या पाहणीनंतर सदर निकाल मनपाद्वारे घोषित करण्यात आला आहे.
मनपातर्फे घेण्यात आलेल्या या स्पर्धेत 23 संघांनी नोंदणी केली होती. नंतर स्पर्धेतुन काही संघांनी नंतर माघार घेतली तर 11 उद्यान व 8 ओपन स्पेस असे मिळुन एकुण 20 संघांनी उद्यान व ओपन स्पेस सौंदर्यीकरण करण्याचे काम पुर्ण केले. स्पर्धेचा कालावधी संपल्यावर सर्व संघांनी आपल्या कामाचे सादरीकरण मनपात केले होते. त्रयस्थ निरीक्षकांद्वारे प्रत्यक्ष स्थळ व सादरीकरण पाहुन गुणांकन देण्यात आले.
यात उद्यान स्पर्धेत बियाणी नगर उद्यान,द्वितीय गजानन महाराज मंदीर उद्यान तर तृतीय क्रमांक जटपुरा बालोद्यान नगिनाबाग या संघाला मिळाला. तसेच लॉक डाऊन ग्राउंड उद्यान,आदर्श उद्यान,महात्मा बसवेश्वर उद्यान,श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी क्रीडा संकुल,ओम नगर उद्यान या संघांना प्रत्येकी 3 लक्ष रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीस मिळाले आहे.
ओपन स्पेस स्पर्धेत बाबुपेठ येथील वाघोबा बहुद्देशीय सामाजिक संस्था प्रथम ,द्वितीय अथर्व कॉलनी ओपन स्पेस तर तृतीय पारितोषिक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संघ यांना मिळाले. तसेच जेष्ठ नागरिक संघ महेश नगर,पसायदान जेष्ठ नागरिक संघ,माँ शारदा ओपन स्पेस,संत तुकडोजी महाराज बालोद्यान,योग्य नृत्य परिवार कृषी भवन या संघांना प्रत्येकी 3 लक्ष रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीस मिळाले आहे.
स्पर्धेत लोकसहभागाने शहरासाठी झालेले कार्य –
1. भाग घेतलेल्या संघांद्वारे अंदाजे 30 हजार 500 स्क्वेअर फूट एवढी जागा – भिंती उत्कृष्टपणे रंगविण्यात आल्या.
2. शहरात जवळपास 2500 झाडे लावण्यात आली.
3. जवळपास 12 हजार किलो टाकाऊ प्लास्टीकचा वापर करून टिकाऊ वस्तू तयार करण्यात आल्या.
4. ओल्या सुक्या कचऱ्याचे 89 कचरा पेट्या बनविण्यात आल्या.
5. 20 उद्यान व ओपन स्पेस संघांद्वारे प्लास्टीक बंदी आणि कापडी पिशवीचा वापर या विषयावर 19 वार्डांमध्ये रॅली काढुन जनजागृती करण्यात आली.
6. स्पर्धकांनी बनविले 10 शिल्प व कारंजे.
7. 20 कंपोस्ट पीट व 21 शोष खड्डे बनविण्यात आले
8. स्पर्धकांनी खुल्या जागेत वापरण्यायोग्य 07 मैदाने तयार केली.
9. एकुण 3400 नागरिक यात प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या सहभागी झाले होते.