• कवयित्री विद्या पिंजरकर यांचा साहित्य व समाज सेवेतील एक प्रवास!
• पिंजरकर सहज सुचलं काव्यकुंजच्या एक जेष्ठ सदस्य!
सुवर्ण भारत:किरण घाटे(विशेष प्रतिनिधी)
महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं काव्यकुंजच्या एक सदस्य विद्या पिंजरकर ह्या विदर्भातील लोकप्रिय कवयित्री असून आज पर्यंत त्यांनी ब-याच कविता शब्दांकित केल्या आहेत.
शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्या आपला काव्यरचना हा छंद जोपासत आहेत.
त्यांच्या अनेक कविता वर्तमानपत्रातून व मासिकांतून प्रकाशित झाल्या आहेत.