Home Breaking News हडस्ती गावातील रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे – सरपंच अंजली पारखी यांचा आरोप

हडस्ती गावातील रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे – सरपंच अंजली पारखी यांचा आरोप

20
Oplus_131072

हडस्ती गावातील रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे – सरपंच अंजली पारखी यांचा आरोप

सुवर्ण भारत:किरण घाटे(विशेष प्रतिनिधी)

बल्लारपूर तालुक्यातील हडस्ती गावांत अंदाजे 12 करोड रुपयांचे रोड व पुलियाचे काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असून संपूर्ण काम हे निकृष्ट दर्जाचे असून
मुख्य गावातून जाणारा रस्ता हा अरुंद ( लहान ) केल्या मुळे दोन बैलगाडी किंवा गाडी एकाच वेळेस या मार्गावरून जाऊ शकत नाही.
नाली तयार करीत असतांना त्यामध्ये लोहा राॅड, सिमेंटचा वापर करून पक्की नाली न बांधता फक्त पाईप लाईनने बनविली आहे.

पुलियामध्ये लोहा वापणाऱ्या कमी mm (कमी दर्जाचा ) वापरण्यात आलेला आहेत, सिमेंट व इतर वस्तू सुद्धा कमी प्रमाणात वापरलेला दिसत आहेत.इतर पण काम बघितलं असता सर्व काम निकृष्ट दर्जाचे असून गावाकऱ्यांना रस्ता लहान असल्यामुळे अतिशय त्रास सहन करावा लागत आहेत . तातडीने रस्ता मोठा करून या रस्त्याची व पुलियाची सखोल चौकशी करून संबधित ठेकेदार,व संबंधित अधिकाऱ्यांवर उचित कारवाई करण्यात यावी अशी मागणी गावातील सरपंच अंजली पारखी व अन्य लोकांनी केली आहे.