• जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग बांधवांना साहित्य वाटप !
• चंद्रपूर फेरो ऐलाॅय संयंत्रचा उपक्रम!
सुवर्ण भारत:किरण घाटे(विशेष प्रतिनिधी)
जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, चंद्रपूर फेरो ऐलाॅय संयंत्र च्या सीएसआर निधी अंतर्गत तसेच जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, दिव्यांग कौशल्य विकास मल्टीपर्पज सोसायटी व अल्मिको यांच्या संयुक्त प्रयत्नाने दिव्यांग बांधवांना उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून संजय कुमार गजभिये एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर सीएफपी तसेच अतिथी म्हणून बी. एम. मोहरकर, बी .यशवंता, राजेश गायकवाड, सी.एम पोडे, अरिंदम डे व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी दिव्यांग बांधवांना कुबडी, सायकल, श्रवण यंत्र, स्मार्ट केन, एलबोस्टिक, साधी स्टिक, व्हील चेअर आणि बॅटरी ऑपरेटेड सायकल, इत्यादी साहित्यांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन चंद्रपूर फेरो ऐलाॅय संयंत्रचे डीजीएम उमेश उके यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्विते करिता अल्मिकोचे डॉ. रोहिणी करांडे, दिव्यांग कौशल्य विकास संस्थेचे निलेश पाझारे, टाटा हॉस्पिटलचे डॉ. आशिष बारबदे, रेडक्रॉसचे डॉ .पियुष मेश्राम, मुन्ना खोब्रागडे,कल्पना शिंदे, यांनी प्रयत्न केले. यावेळी भास्कर कांबळे, सतीश मूल्लेवार, रवींद्र उपरे, सुभाष मोहुर्ले, उत्तम साव, अर्पिल चौधरी, पुष्पा, ललिता, किरण इत्यादिंचे सहकार्य लाभले.