Home Breaking News Gadchiroli DIST# News • जिल्हा परिषदेचे माजी सभापती मुतन्ना पेंदाम अनंतात विलीन...

Gadchiroli DIST# News • जिल्हा परिषदेचे माजी सभापती मुतन्ना पेंदाम अनंतात विलीन • असंख्यांच्या जनसमुदायात अंत्यविधी

64
Oplus_131072

Gadchiroli DIST# News
• जिल्हा परिषदेचे माजी सभापती मुतन्ना पेंदाम अनंतात विलीन

• असंख्यांच्या जनसमुदायात अंत्यविधी

सुवर्ण भारत:शंकर महाकाली (संपादक)

अहेरी:- तालुक्यातील देवलमरी नजीकच्या कोत्तागुडम येथील गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी सभापती मुतन्नाजी पेंदाम यांचे उच्च रक्तदाबामुळे रविवार 8 डिसेंबर रोजी सकाळी साडे नऊ वाजताच्या दरम्यान निधन झाले.
विशेष म्हणजे मागील अनेक वर्षांपासून अहेरी येथे ते वास्तव्यास व स्थायी झाले होते, रविवारी सकाळी तब्येतीत अस्वस्थ वाटल्याने अहेरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तब्येत अधिकच खालावल्याने प्राथमिक उपचारा नंतर त्यांना चंद्रपूरला हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिले. चंद्रपूरला नेत असतानाच वाटेतच आष्टी नजीक त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
विशेष म्हणजे जिल्हा एक असताना प्रारंभी चंद्रपूर जिल्हा परिषदेत व नंतर गडचिरोली जिल्हा परिषदेत असे तब्बल चारदा मुतन्नाजी पेंदाम निवडून गेले त्याच दरम्यान एकदा बांधकाम व आरोग्य सभापती पदही भूषविले. वयाच्या 71 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मावळली.
रविवार 8 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता त्यांचे मूळगाव कोत्तागुडम येथील स्मशानभूमीत असंख्य जनसमुदायाच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्येष्ठ मुलगा नागेश पेंदाम यांनी पार्थिवाला भडाग्नी दिले. त्यानंतर शोकसभा व मौनधारण करून श्रद्धांजली वाहण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक विवाहित मुलगी व बराच मोठा आप्तपरिवार आहे.
अंत्य विधीच्या वेळी अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र बाबा आत्राम, डॉ. कन्ना मडावी, समता मडावी, माजी पंचायत समिती सदस्य रामेश्वरराव बाबा आत्राम, श्रीकांत मद्दीवार, विलास बंडावार, डेव्हिड बोगी, नामदेव आत्राम, रियाज शेख, सुरेंद्र अलोणे, रामचंद्र ढोलगे, सुल्तान पठाण, सोमाजी झाडे, नितीन दोंतूलवार, नागेश मडावी, पितांबर कुळमेथे आदी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, मित्र परिवार, चाहते, गावकरी व असंख्य नागरिक अंत्यविधीत सामील होते.

*जनसेवा व समाज हितासाठी झटणारा सच्चा नेता हरपला*
शोकसभेत मान्यवरांचे शोकसंवेदना…

जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती मुतन्नाजी पेंदाम यांच्या पार्थिवावर भडाग्नी दिल्यानंतर डॉ. कन्ना मडावी यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा घेण्यात आले.
शोकसभेत वैद्यकीय अधीक्षक डॉ. कन्ना मडावी, समता मडावी, अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रविंद्र बाबा आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख, सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोणे आदींनी स्व. मुतन्नाजी पेंदाम यांच्या सामाजिक व राजकीय कार्यावर प्रकाश टाकून मुतन्नाजी पेंदाम आजतागायत अविरत व अविश्रांत पणे समाज हितासाठी झटत होते समाज हितासाठी झटणारा एक सच्चा नेता हरपल्याचे मान्यवरांनी सुर उमटवून भावपूर्ण श्रद्धांजली वाहीले आणि पेंदाम कुटुंबियांच्या दुःखात सामील असून दुःखातून सावरण्यासाठी शक्ती व बळ प्राप्त होवो अशी मनोकामना केले.