Home Breaking News • माता बालक दिवस बल्लारपूर भालेराव पब्लिक स्कूल मध्ये साजरा

• माता बालक दिवस बल्लारपूर भालेराव पब्लिक स्कूल मध्ये साजरा

81
Oplus_131072

• माता बालक दिवस बल्लारपूर भालेराव पब्लिक स्कूल मध्ये साजरा

सुवर्ण भारत:शंकर महाकाली (संपादक)

बल्लारपूर: माता बालक दिन निमित्त नृत्य व गायन स्पर्धा भालेराव पब्लिक स्कूल मध्ये दिनांक ०७/१२/२४ आयोजित करण्यात आले. याप्रसंगी शाळेच्या संचालिका आशा गायकवाड, उपसंचालक वैभव गायकवाड, शाळेच्या मुख्याध्यापिका सीमा भास्करवार,तसेच संपूर्ण शिक्षक गण यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनी सुद्धा कार्यक्रमाचा आनंद घेत नृत्य व गायन स्पर्धेचा आनंद घेत कार्यक्रमाचा उत्साह वाढविला. या कार्यक्रमांमध्ये नर्सरी ते वर्ग चौथा या वर्गातील सर्व विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन सानू मेंडीज यांनी केले. या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून श्रद्धा वाघ व दीपिका यादव यांनी केले. या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थी पालक वर्ग व शिक्षकांनी आनंदाच्या वातावरणात हा कार्यक्रम पार पडला.