❗❗🔲 होय*🔲❗❗
सुवर्ण भारत:किरण घाटे (विशेष प्रतिनिधी)
मी तुटले तरी उभी राहीन…
संकटांचा सामना करीत
करीत पुढे जाईन…
माझ्या पावलांना थांबवू शकेल कोणी???
होय,विजयी होण्यास धडपड करेल रजनी…
जीवनी आले वादळ जरी
होय स्वप्नासाठी झगडणार धरी..
जिथ प्रकाश नाही तिथ उजेड आणीन…
होय मी अस्तित्वाची ओळख घडवीन..
होय,तुझ प्रेम माझ बळ
संघर्षमय जीवनातील मूळ
तुझा विश्वास मला तारतो
होय प्रत्येक क्षणी तुझं
अस्तित्व मला तारतो..
तु असतांना वाटे स्वर्ग
याचाच मज वाटे गर्व
तू म्हणालास तिथल माझ गंतव्य
होय तुझे प्रेमच माझं आयुष्य
⬜🌀⬜रजनी प्रल्हाद पोयाम/भादिकर ,सहज सुचलं सदस्य
वणी -जिल्हा-यवतमाळ