Home Breaking News • शहिद जवान अक्षय यांना शासकीय इतमानात अग्नी

• शहिद जवान अक्षय यांना शासकीय इतमानात अग्नी

94

• शहिद जवान अक्षय यांना शासकीय इतमानात अग्नी

सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनिधी,वरोरा

वरोरा तालुक्यातील पिंपळगाव येथील शहिद अक्षय निकुरे यांचे पार्थिव सकाळी त्याचे निवासस्थानी पोहचले. अक्षय che पार्थिव एक तास घरी जनतेला अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. मराठा अकरा बटालियन जवाना मार्फत हवेत तीन बार फायरिंग करून सलामी देण्यात आली. आणि एक वाजून दोन मिनिटांनी मुखागणी देण्यात आली.
अंत्यविधीला तहसीलदार योगेश कौटकर, नायब तहसीलदार मधुकर काळे, बिडीओ गजानन मुंडकर, पोलीस उपविभागीय अधिकारी नयोमी साटम, पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांनी शासकीय भावपूर्ण श्रदांजली दिली. तर मुखागणी शहिद अक्षयचा लहान भाऊ मराठा अकरा बटालियनचे जवान निलेश दिगंबर निकुरे यांनी दिली. शोकसभा अध्यक्ष मराठा अकरा बतालियन चे कर्नल गुरुचरण बिश यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर,आमदार करण देवतळे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती विजय देवतळे, योगिता लांडगे, पुनर्निर्वाह माजी सैनिक संघटना, मुकेश जिवतोडे, किशोर डुकरे, योगिता लांडगे, माजी सैनिक जिल्हा संघटना अध्यक्ष बोभाटे, जिल्हा सहसचिव वामन राजूरकर, या मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
जब तक सूरज चांद रहेगा, अक्षय तेरा नाम रहेगा, वंदे मातरम, भारत माता की जय, जय जवान, जय किसान, अमर रहे, अमर रहे अशा घोषणानी परिसर पूर्णतः दुमदूमला. परिसरातील जनतेला साश्रू नयनानी अक्षयला भावपूर्ण श्रदांजली वाहिली. तसेच माजी सैनिक जिल्हा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून श्रदांजली वाहिली.