• हिरालाल लोया विद्यालयात विज्ञान महोत्सव
सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनिधी,वरोरा
वरोरा :शिक्षण हा एक महत्वाचा राष्ट्रीय उपक्रम असून तो राष्ट्रीय कार्यक्रमाचा कणा आहे. राष्ट्रीय वृत्ती व राष्ट्रीय व्यक्तिमत्व यांची वाढ करणे, व्यक्तींमध्ये मुल्य संस्कार घडविणे, ज्ञानात्मक, भावनात्मक आणि क्रियात्मक अशा तिन्ही स्तरातून मूल्यांच्या संस्कारांची प्रतिक्रिया पूर्ण होईल हे पहावे लागते. हि मुल्ये विद्यार्थ्यांनी स्वीकारावीत अशा प्रकारची परिस्थिती, वातावरण निर्माण करण्यासाठी, विध्यार्थीची योग्य दिशेने प्रगती , विज्ञान व गणित विषयाची आवड, तसेच वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होण्यासाठी हिरालाल लोया विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, वरोरा येथे दिनांक १९/१२/२०२४ ते २१/१२/२०२४ तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
पहिल्या दिवशी १९ डिसेंबर रोज गुरुवारला विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. यात ५ ते १२ च्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून विविध प्रतिकृती तयार करून विद्यार्थ्यांद्वारे त्या प्रतिकृतीचे सादरीकरण करण्यात आले. यात ५ ते ८ गटात ३६ विद्यार्थ्यांनी तर ९ ते १२ गटात २० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.५ ते ८ गटात अनुश्री घेंगारे या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक, तर ९ ते १२ गटात हिमांशू डंभारे या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक मिळविला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य महेश डोंगरे उपस्थित होते.या कार्यक्रमाचे उदघाटन सुहास पोतदार सर, प्राचार्य आनंदनिकेतन कृषी महाविद्यालय, वरोरा यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे पदाधिकारी रामबाबु लोया, शामबाबू लोया व चाहरे साहेब गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती वरोरा, उपस्थित होते. तसेच लोकमान्य विद्यालयाचे मुख्याध्यापक राहुल राखे सर, सुनिता मुळे, वीणा आंबटकर, व वामन आसुटकर यांनी विशेष उपस्थिती दर्शविली. प्रतिकृतींचे परीक्षण दीप्ती चिटणीस, ओमप्रकाश निमेकर, प्रियवंदा बागेसर यांनी केले.
२० डिसेंबर शुक्रवारला विज्ञान प्रश्नमंजुषा हा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला. या कार्यक्रमात वर्ग ५ ते ७ तसेच वर्ग ८ ते १० विद्यार्थ्यांचे प्रत्येकी ५ गट तयार करून प्रश्नमंजुषा हा कार्यक्रम घेण्यात आला.
शेवटच्या दिवशी २१ डिसेंबर रोज शनिवारला गणित दिवस साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाला गणित तज्ञ रुपेश घागी सर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी गणित विषयाचे विविध पोस्टरचे सादरीकरण केले. या कार्यक्रमांतर्गत गणित विषयाची काही शैक्षणिक साहित्यांची निर्मिती करून त्यांचे सादरीकरण करण्यात आले. तसेच गणित विषयाच्या आधारावर रांगोळी स्पर्धा व गणित विषयी गाणी यांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत १७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
