Home Breaking News • बल्लारपूर शहरात पर्यावरण संवर्धन व संरक्षण समिती तर्फे वृक्षरोपण

• बल्लारपूर शहरात पर्यावरण संवर्धन व संरक्षण समिती तर्फे वृक्षरोपण

75

• बल्लारपूर शहरात पर्यावरण संवर्धन व संरक्षण समिती तर्फे वृक्षरोपण

सुवर्ण भारत: शंकर महाकाली (संपादक)

बल्लारपूर:बस्ती विभागात झाडे लावून शहरात पर्यावरण संवर्धन व संरक्षण समिती तर्फे वृक्षारोपण करण्यात आले. अध्यक्षस्थानी तहसीलदार अभय गायकवाड होते. बल्लारपूर नगर परिषद मुख्याधिकारी विशाल वाघ, वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन मेश्राम, बल्लारपूरचे पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे, पत्रकार वसंत खेडेकर प्रमुख उपस्थित होते.

या वेळी कौन बनेगा करोडपती मध्ये सहभागी घेतलेले जमजम पठाण व दोन सुवर्ण पदक विजेता आरुष चव्हाण तसेच सामान्य परिवारात राहून समाज सेवा करणारे जाकिर भाई यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले

पर्यावरण संवर्धन व संरक्षण समितीचे अध्यक्ष काशिनाथ सिंग,उपाध्यक्ष हनुमानसिंग खेंगर, हिरालाल सोनी, सचिव परविंदर अरोरा, कोषाध्यक्ष गोपाल अरोरा, सदस्य नरेंद्र तिलोकणी, किशोर तिलोकाणी, राजू मुद्रा, करण सलुजा, यशपाल सिंह,आबिद शेख, कुलबिर, बलवीर अरोरा उपस्थित होते  कार्यक्रमाचे संचालन विक्की दुपारे यांनी केले.