Home Breaking News • दुचाकी उडान पुलाच्या भिंतीला जोरदार धडक दिल्याने एक जागिच ठार तर...

• दुचाकी उडान पुलाच्या भिंतीला जोरदार धडक दिल्याने एक जागिच ठार तर दोन जन गंभीर जखमी

344

• दुचाकी उडान पुलाच्या भिंतीला जोरदार धडक दिल्याने एक जागिच ठार तर दोन जन गंभीर जखमी

सुवर्ण भारत: राजेश येसेकर भद्रावती तालुका प्रतीनिधी

भद्रावती : चंद्रपूर – नागपुर हायवे रोडवरील पुलाला टिब्बल सिट दुचाकी भरधाव वेगाने उडान पुलाच्या भिंतीला जोरदार धडकल्याने झालेल्या अपघातात एका युवकाचा घटनास्थळीत मृत्यू झाला असून दोघे युवक गंभीर जखमी झाले आहे.

सदर घटना काल दिनांक ५ रोज बुधवारला रात्रो 11वाजताच्या दरम्यान शहरातील हायवे वरील उडान पुलाजवळ घडली. दोन्ही जखमी युवकांना चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे.

अमोल भिंगारदिवे वय 22 वर्ष,सुजल बहादे व लहू धोटे हे तीन युवक नंबर प्लेट नसलेल्या एका काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीने शहरातील पंचशील नगरातून हायवेकडे भरधाव वेगाने जात असताना सदर दुचाकी उडान पुलाच्या भिंतीला आदळली. या अपघातात अमोल भिंगारदिवे या युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर सुजल बहादे व लहू धोटे हे दोघे गंभीर जखमी झाले आहे. त्यांना उपचारासाठी चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले,मृतकाला ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथे, शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आले. घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.