Home Breaking News • वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण च्या विरोधात आक्रोश मोर्चा संपन्न— •...

• वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण च्या विरोधात आक्रोश मोर्चा संपन्न— • शेतकऱ्याचा अंत पाहू नका– तत्काळ विद्युत पुरवठा सुरळीत करा— राजेंद्र आमटे

293

• वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण च्या विरोधात आक्रोश मोर्चा संपन्न—
• शेतकऱ्याचा अंत पाहू नका– तत्काळ विद्युत पुरवठा सुरळीत करा— राजेंद्र आमटे

सुवर्ण भारत : गोरख मोरे
बीड जिल्हा प्रतिनिधी

खांडे पारगाव परिसरातील शेतकऱ्यांना विद्युत पुरवठा सुरळीत होत नसल्याने वैतागलेल्या शेतकरी, नागरिक महिला, विद्यार्थी यांच्या वतीने महा वितरण विरोधात शेतकरी आक्रोश मोर्चा, व जाहीर निदर्शने आंदोलन शिवसंग्राम शेतकरी जिल्हाध्यक्ष राजेंद्र आमटे यांच्या पुढाकाराने अधीक्षक अभियंता विभागीय महावितरण कार्यालय जालना रोड बीड येथे करण्यात आले .
महावितरण अधीक्षक अभियंता विभागीय कार्यालय जालना रोड बीड येथे प्रभारी अधीक्षक अभियंता कांबळे साहेब व कार्यकारी अभियंता सानप साहेब यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालय मध्ये जाहीर निदर्शने केली असून , ३ तास शेतकरी, महिला, नागरिक यांनी ठिय्या आंदोलन केलं . शेतकरी महावितरण विरोधात आक्रमक भूमिका घेतली असून , लेखी आश्वासन दिल्याशिवाय न उठण्याचा निर्णय शेतकरी घेतल्याने शेतकऱ्यांच्या भूमिके पुढे प्रशासन झुकले असून , तत्काळ लेखी आश्वासन देत आंदोलन मघे घेण्याचे विनंती केल्यावर शेतकऱ्यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले .
या प्रसंगी आमदार संदीप क्षीरसागर यांनी शेतकरी आक्रोश मोर्चाला भेट देऊन पाठींबा दिला असून , अधिकारी यांना सूचना दिल्या , व डॉ ज्योतीताई मेटे यांनी अधीक्षक अभियंता यांना दूरध्वनी संपर्क करून प्रश्न सोडवण्याच्या सूचना केली . जिल्हाध्यक्ष सुभाष जाधव , शिवसंग्राम जिल्हाध्यक्ष, राजेंद्र मस्के , राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, यांनी शेतकरी आंदोलनास भेट देऊन पाठींबा दिला .
अधीक्षक अभियंता महावितरण यांनी सात गावातील विद्युत पुरवठा सुरळीत केला जाईल, सात गावात नवीन विद्युत तारा बदलण्याचे काम सुरू करू ,उच्च दाबाने विद्युत पुरवठा केला जाईल, 5 MVA ट्रान्सफॉर्मर निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर बसवण्याची अंमलबजावणी करू, नवीन विद्युत उपकेंद्र प्रस्ताव मागून घेण्यात येईल, शेख यांची नियुक्ती निर्णय घेण्यात येईल वरील मागण्याचे लेखी आश्वासन देत आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले .

आमदार संदीप क्षीरसागर यांनी शेतकरी आक्रोश मोर्चा भेट देऊन पाठींबा दिला . व तसेच
डॉ ज्योतीताई मेटे यांनीही अधीक्षक अभियंता यांना दूरध्वनी सूचना केल्या असून पाठींबा दिला .
या मुळे खांडे पारगाव परिसरातील खांडे पारगाव, अंथरवान प्रिंपी, नागपूर खुर्द, उमरद खालसा, नागपूर बुद्रुक, उमरी, अंथरवान प्रिंपि तांडा वेळी शेतकऱ्याने आक्रमक भूमिका घेत तत्काळ मागण्या करण्यात यावी , असे शिवसंग्राम शेतकरी जिल्हाध्यक्ष राजेंद्र आमटे, जालिंदर साळुंके,राहुल टेकाळे सचिव प्रदेश युवक काँग्रेस, सुहास पाटील,अनिल घुमरे, शिवसंग्राम सरचिटणीस, सरपंच भाई प्रभाळे, काचारू जाधव, दीपक खुराने,गणेश घोडे उमरद सरपंच, सुभाष गिराम, मनोज जाधव शिवसंग्राम , किशोर ढोकणे सरपंच, सुरेश पवार, इंद्रजित लव्हाले, वसंत शिंदे, प्रवीण शिंदे,तीर्थराज साळुंके, जांगु साळुंके,आदी सह शेकडो शेतकरी उपस्थित होते