Home Breaking News #Beed dist एकलव्य माध्यमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाला जनसागर लोटला— स्नेहसंमेलनात युवकांनी...

#Beed dist एकलव्य माध्यमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाला जनसागर लोटला— स्नेहसंमेलनात युवकांनी प्रेक्षकांची मने जिंकली—

140

#Beed dist एकलव्य माध्यमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाला जनसागर लोटला—

स्नेहसंमेलनात युवकांनी प्रेक्षकांची मने जिंकली—

सुवर्ण भारत: गोरख मोरे 
बीड जिल्हा प्रतिनिधी
8087175712

वडवणी तालुक्यातील डोंगर पट्ट्यात चिखलबीड याठिकाणी शिक्षणाचा वटवृक्ष म्हणुन उभा असलेली एकलव्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शाळा गेल्या पंचवीस वर्षापासुन विद्यार्थी घडवण्याचे काम मोठ्या जोमाने करत आहे। याच शाळेने ग्रामीन भागात कुठेच होत नसलेला स्नेह संमेलनाचा कार्यक्रम पहिल्यांदा घेतला , अन आश्चर्य म्हणजे या कार्यक्रमाला चिखलबीड हे अख्खं गाव व पंचक्रोशीतील जनसागराने तोबा गर्दि केली . या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी विविध हिंदी , मराठी गाण्यावर अप्रतीम डान्स करत धम्मालच उडवून देऊन उपस्थीत प्रेक्षकांची मने जिंकली .
सविस्तर माहिती अशी की , वडवणी तालुक्यातील डोंगरपट्टयासारख्या दुर्गम भागात गेल्या पंचवीस वर्षापुर्वी एकलव्य माध्यमिक विद्यालय नावाचं शिक्षणाचे रोपटे लावले , अन् पहाता पहाता हे रोपट्याचा वटवृक्ष झाला , खेड्यापाड्यात राहाणारे हजारो विध्यार्थी या शाळेमुळे शिक्षक, डाॅक्टर,इंजिनिअर,वकिल, पोलिस झाले आहेत . चिखलबीड याठिकाणी शिक्षणाचा वटवृक्ष म्हणुन उभा असलेली एकलव्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ही शाळा गेल्या पंचवीस वर्षापासुन विध्यार्थी घडवण्याचे काम मोठ्या जोमाने करत असून ,
या शाळेच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर विद्याथ्यार्थ्यांच्या कला गुणांन वाव मिळावा म्हणुन स्नेहसंमेलनाचा सांस्कृतीक कार्यक्रम घेण्यात आला . या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते,यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध वेष भुषा परीधान करत हिंदी मराठी गाण्यावर चिमुकल्या विद्यार्थांनी धम्माल उडवून दिली. कार्यक्रमाची सुरुवात ! गणेश वंदनेने अरण्यात आली असून
पुष्पा, लुंगी डान्स,वारी चुकायची नाही,शिवाजी महाराजांचा कीर्ति पोवाड़ा, तेरी मिठी में मरजावा, यासह शेकडो गाण्यवर अप्रतीम डान्स केला. प्रेक्षक पालकांनीही युवाकलाकारांच्या कलेला टाळ्यांच्या कडकडाटासह दाद दिली. या कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेच्या संस्थापिका मा. सुशिलाताई मोराळे मॅडम यांनी केले,तर प्रमुख उपस्थिती म्हणुन चिंचवनचे केंद्रप्रमुख सुनिल मुंडे, मुख्याध्यापक घुले सर, सरपंच सौ. सागर विलास वडणे, जेष्ठ नेते कानिकराव मुंडे,सरपंच विकास मुंडे, लोकमानसचे संपादक सतिशजी वाघमारे, पोलिस पाटील गुलाब वाघमारे, चेअरमन आश्रुबा वडणे, श्रीमंत(आप्पा) नेहरकर, बाबासाहेब होंडे, युवा नेते रंजित वडणे, मुस्तफा (भैया) पठाण, महादेव फरांडे, यांची
कार्यक्रमासाठी उपस्थिती होती .
कार्यक्रमासाठी परीश्रम घेणारे शाळेचे कर्तव्यदक्ष मुख्याद्यापक कानाडेसर,
आघाव सर, बोदर सर, चव्हाण एस बी, सानप सर, साखरे सर, आंधळे सर, चंदनशिव सर ,नेकनुरकर सर, लव्हाळे सर, ठोंबरे सर, यादव सर, गवारे सर, राऊत सर, तोगेमॅडम, देशमुख, चोलेसर ,नेहरकर, सह सर्व शिक्षक यांनी मेहनत घेतली असून , कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चव्हाण डीटी, यांनी करुन ऊपस्थीतांचे अभार बोंद्रे सर यांनी मानले .

“बक्षिसांचा वर्षाव
या शाळेच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर विद्याथ्यार्थ्यांच्या कला गुणांन वाव मिळावा म्हणुन स्नेहसंमेलनाचा सांस्कृतीक कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये विद्यार्यांच्या विविध वेष भुषा परीधान करत हिंदी , मराठी गाण्यावर चिमुकल्या विद्यार्थांनी धम्माल उडवून दिली. हा कार्यक्रम पहाण्यासाठी चिखलबीड हे अख्खं गाव शाळेच्या मैदानात उपस्थित झाले होते , तर विद्यार्थांच्या प्रत्येक गाण्यावर हाजारो रुपयांचे बक्षिस येत होते,संपुर्ण कार्यक्रमात एकूण पंचवीस हजार रुपये जमा झाले.”