Home Breaking News लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशन व जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत...

लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशन व जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबीर आयोजित

134

लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशन व जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबीर आयोजित

सुवर्ण भारत:पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर

लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशन आणि जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने सामाजिक दायित्व विभागांतर्गत आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण,सामाजिक जनजागृती यासारखे वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहे.याच माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांची सेवा व्हावी व नागरिकांना योग्य उपचार गावातच मिळावे यासाठी दिनांक २० जानेवारी ते 10 फेब्रुवारी २०२५ ला धानोरा,मुरसा, पांढरकवडा,अंतुर्ला,शेणगाव व उसगाव या ग्रामीण भागात मोफत आरोग्य तपासणी शिबीर व नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले.या आरोग्य तपासणी शिबिरात नेत्र तपासणी बीपी,शुगर अशा अनेक रोगांची तपासणी करून मोफत औषध वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमाला उदघाटक म्हणून लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड चे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रशांत पुरी , प्रमुख पाहुणे म्हणून गावाचे सरपंच,लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशनचे उपव्यवस्थापक दिपक साळवे,सामान्य रुग्णालयचे वैद्यकीय अधिकारी ड्रॉ.अमित ढवस,ड्राॅ. राठोड,डॉ पोटदुखे,भासारकर, विकास मसराम,सौ.पुष्पाताई मालेकर,विजय आगरे,सुरज तोतडे,मंगेश आसुटकर,विनोद खेवले,रमेश खवसे, अनिता जोगी,सौ.निविदिता ठाकरे, सुनील मोरे,स्नेहा रणदिवे, अनुराग मत्ते,अरविंद चौधरी सामान्य रुग्णालय चे अधिकारी व ग्राम पंचायत कमिटी उपस्थित होती. आरोग्य शिबिराची संपूर्ण माहिती दिपक साळवे यांनी दिली तर कार्यक्रमाचे उदघाटक लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड चे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री.प्रशांत पुरी यांनी सामाजिक दायित्व विभाग मार्फत चालू असलेल्या कामाची माहिती दिली व भविष्यात सुद्धा सामाजिक कार्य लॉयडस इन्फिनाईट फाउंडेशन करत राहील आणि समाजासाठी नेहमी तत्पर राहील असे प्रतिपादन केले.आरोग्याची काळजी कशी घ्यायची, आजार कसा रोखायचा याची संपूर्ण माहिती ड्राॅ.ढवस, राठोड,ड्राॅ.पोटदुखे यांनी दिली. शिबिराचा उद्देश ग्रामीण भागातील नागरिकांना गावात योग्य उपचार मिळावेत,यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १५९७ नागरिकांनी आरोग्य व नेत्र तपासणीचा लाभ घेतला.
आरोग्य शिबिराच्या यशस्वीतेसाठी लॉयड्स इन्फीनाईट फाउंडेशन च्या संपूर्ण टीम ने अथक परिश्रम घेतले व कार्यक्रम पार पाडला.