Home Breaking News #Beed dist दांडीबाहदर अधिकारी यांच्या कार्यालयाचे स्टींग ऑपरेशन करण्यासाठी मनसेचे कैलास दरेकर...

#Beed dist दांडीबाहदर अधिकारी यांच्या कार्यालयाचे स्टींग ऑपरेशन करण्यासाठी मनसेचे कैलास दरेकर यांनी मागितली तहसीलदार यांच्याकडे परवानगी—

122

#Beed dist दांडीबाहदर अधिकारी यांच्या कार्यालयाचे स्टींग ऑपरेशन करण्यासाठी मनसेचे कैलास दरेकर यांनी मागितली तहसीलदार यांच्याकडे परवानगी—

सुवर्ण भारत : गोरख मोरे
बीड जिल्हा प्रतिनिधी
8087175712

शासनाने प्रत्येक कार्यालयासाठी पाच दिवसांचा आठवडा केला असून , या पाच दिवसांच्या आठवड्यात सुद्धा काही कर्मचारी –अधिकारी पाच दिवस उपस्थित नसतात , ते कुठे असतात हे कुणालाच माहीत नसतं . कार्यालयीन वेळ सकाळी 9.30 ते सायंकाळी 6 वा. ची वेळ परंतु कोणता कर्मचारी अधिकारी केव्हाही येतात जातात यामुळे सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास होतो . त्यांची छोट छोटी कामं खोळबंतात . तसेच अनेकदा अनेक कार्यालत महापुरुषांच्या जयंती सुद्धा साजरी करण्याची पद्धत नाही , संबंधित कार्यालयातील अधिकारी यांना याचं भान रहात नाही , या मुळे आष्टी तालुक्यातील सर्व कार्यालयातील गैरहजर अधिकारी/ कर्मचारी यांच्या कार्यालयावर स्टींग ऑपरेशन करण्याची परवानगी मनसेचे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांनी निवेदन देवून आष्टी तहसीलदार यांच्याकडे परवानगी मागितली आहे . मा.तहसिदार कैलास
दरेकर यांना स्टींग ऑपरेशन करून व्हिडिओ चित्रीकरण करण्याची परवानगी देणार का? याकडे सर्व मतदारसंघाचं लक्ष लागले आहे .