Home Breaking News #Beed dist पर्यावरण मंत्री ना.पंकजा मुंडे बिंदुसरा नदीचे पुनरज्जीवन करावे ; बिंदुसरा...

#Beed dist पर्यावरण मंत्री ना.पंकजा मुंडे बिंदुसरा नदीचे पुनरज्जीवन करावे ; बिंदुसरा नदी प्रदुषण व अतिक्रमण मुक्त करा— मागणीसाठी बिंदुसरा नदीपात्रात लक्ष्यवेधी आंदोलन— डॉ.गणेश ढवळे

120

#Beed dist पर्यावरण मंत्री ना.पंकजा मुंडे बिंदुसरा नदीचे पुनरज्जीवन करावे ; बिंदुसरा नदी प्रदुषण व अतिक्रमण मुक्त करा—
मागणीसाठी बिंदुसरा नदीपात्रात लक्ष्यवेधी आंदोलन— डॉ.गणेश ढवळे

Oplus_16908288

सुवर्ण भारत : गोरख मोरे
बीड जिल्हा प्रतिनिधी
8087175712

बीड शहरातील बिंदुसरा नदीचे पुनर्जीवन करावे , बिंदुसरा नदीपात्रातील अतिक्रमित बांधकाम तसेच नगरपरिषद कर्मचाऱ्यांमार्फत कचरा टाकणे तसेच जैविक कचरा यामुळे नदीचे प्रदुषण होत असुन बीडकरांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे . बिंदुसरा नदीच्या प्रदूषणास जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी , आणि बिंदुसरा नदीचे पुनर्जीवन करावे या प्रमुख मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉ.गणेश ढवळे लि़बागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.17 सोमवार रोजी सकाळी बिंदुसरा नदीवरील दगडी पुल नदीपात्रात लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात येऊन जिल्हाधिकारी बीड, मुख्याधिकारी नगरपरीषद बीड यांच्या मार्फत पर्यावरण मंत्री, वातावरणीय बदल मंत्री पंकजाताई मुंडे, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितजी पवार, उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांना निवेदन देण्यात आले .
या प्रसंगी आंदोलनात रामनाथ खोड, शेख युनुस, बीड जिल्हाध्यक्ष आप अशोक येडे, बीड जिल्हाध्यक्ष इंटक रामधन जमाले, सुदाम तांदळे, पांडुरंग हराळे,शेख मुबीन आदी जन सहभागी झाले होते .
सविस्तर माहितीस्तव—
बीड शहरातील बिंदुसरा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर सांडपाणी कचरा व जैविक कचरा टाकण्यात आल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नदीचे प्रदुषण झाले . त्यामुळे
बीड शहरातील बिंदुसरा नदी प्रकल्पाचा आढावा घेऊन बिंदुसरा नदीपात्रातील भुमाफियांकडुन होणारे अतिक्रमित बांधकाम, बिंदुसरा नदीपात्रात मनपा कर्मचाऱ्यांमार्फत टाकला जाणारा कचरा तसेच जैविक कचरा यामुळे बीडकरांचे आरोग्य धोक्यात असुन भविष्यात 1998 सारखी पुरस्थिती निर्माण झाल्यास मोठ्या प्रमाणावर वित्तहानी आणि जिवितहानी होऊ शकते , या साठी नगरपरिषदेने सीमारेषा आखुन फ्लड झोन,ग्रीन झोन,रेड झोन, यल्लो झोन आदी बाबत उपाययोजना करण्यात यावी. पूररेषेच्या आत असणारी अतिक्रमित बांधकाम प्रकरणी हलगर्जीपणा करणाऱ्या नगरपरिषद प्रशासनातील अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली आहे .