•आनंद विद्यालयात आनंदाने पार पडला स्नेहमिलन सोहळा ! •विद्यार्थ्यांनी एकत्र येत दिल्या जुण्या आठवणींना उजाळा!
सुवर्ण भारत:किरण साळवी प्रतिनिधी
मूल:वैराग्यमूर्ती गाडगे महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून मूल तालुक्याच्या बेंबाळ येथील आनंद विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात सन 2000- 2001 मध्ये अकरावी व बारावी शिक्षण घेत असलेले माजी विद्यार्थी तब्बल 24 वर्षानंतर एकत्र येत त्यांनी स्नेह मिलन सोहळा आयोजित केला.तदवतंच त्यांनी जुन्या आठवणींना परत एकदा उजाळा दिला. सदरहु कार्यक्रमाच्या निमित्ताने शिक्षक मंडळीचा या वेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य व्ही.पी. कुंभारे यांनी विभुषीत केले होते तर या कार्यक्रमाला सत्कारमूर्ती व प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डी.जे. टिपले जे.ओ. भडके , प्रा.एम. एम. कोसे प्रा .बि.डी ठिकरे ,प्रा. के. आर. मनवर यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली होती.मोठ्या उत्साहात व आनंदात पार पडलेल्या या स्नेहमिलन कार्यक्रमात 50 माजी विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी आपला सहभाग नोंदविला होता . उपरोक्त कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन प्राध्यापक विशाल आरेकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार मुंथादेवी झाडे यांनी मानले . स्नेहमिलनाचा कार्यक्रम आयोजित करण्याचा व सर्व विद्यार्थ्यांना एकत्रित आणण्याचे कार्य नितीन कुंभारे या माजी विद्यार्थ्यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व माजी विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले .
माजी विद्यार्थ्यांचा सदैव स्मरणात राहील असा हा स्नेहमिलन सोहळा आनंदात व खेळीमेळीच्या वातावरणात पडला अशी प्रतिक्रिया शरद नागापुरे यांनी कार्यक्रम संपल्यानंतर या प्रतिनिधीशी बोलताना दिली.
