शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने रोखठोक प्रहार कामगार संघटनेतर्फे शालेय साहित्य वाटप!
सुवर्ण भारत: किरण घाटे(संपादक)
चंद्रपूर:महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त रोखठोक प्रहार कामगार संघटनेचे संस्थापक- अध्यक्ष महेशभाऊ हजारे यांनी शहरातील स्थानिक सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळेतील 120 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करुन आज अनेकांच्या उपस्थीतीत शिवजन्मोत्सव साजरा केला.
या वेळी शालेय विद्यार्थ्यांना स्कुल बॅग, नोटबोक,पेन व बिस्किटचे वाटप करण्यात आले.शालेय विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम साजरा झाला याचा मनस्वी आनंद आपणांस वाटत असल्याचे मत रोखठोक प्रहार कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेशभाऊ हजारे यांनी व्यक्त केले.
सावित्रीबाई फुुले प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव आपल्या भाषनातुन केला.
या प्रसंगी शालेय विद्यार्थ्यांनी सुरेख नृत्य करुन उपस्थितांची मने जिंकली.
आयोजित कार्यक्रमाला या प्रभागातील शिवप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थीती लाभली होती.
सदरहु कार्यक्रमाचे नियोजन सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका रजनी पोडे यांच्या सह शिक्षिका किरण करपे, सुप्रिया साव व सिमा पोडे यांनी उत्तमरित्या केले होते.