Home Breaking News रीना हिच्या आत्महत्यास घरमालक मधुकर ढोके दाम्पत्यच जबाबदार :- संतोप मांडवकर यांचा...

रीना हिच्या आत्महत्यास घरमालक मधुकर ढोके दाम्पत्यच जबाबदार :- संतोप मांडवकर यांचा आरोप वरोरा पोलीस स्टेशन हदितील खळबजनक घटना महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या दणक्याने वरोरा पोलिसांना आली जाग…

306

• रीना हिच्या आत्महत्यास घरमालक मधुकर ढोके दाम्पत्यच जबाबदार :- संतोप मांडवकर यांचा आरोप

• वरोरा पोलीस स्टेशन हदितील खळबजनक घटना

• महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या दणक्याने वरोरा पोलिसांना आली जाग…

राजेश येसेकर : तालुका प्रतिनिधी भद्रावती /वरोरा

भद्रावती / वरोरा : वरोरा शहरात जवळिल रामवाटिका बोर्डा येथील घरमालक यांच्या सततच्या वादातून महिलेने आत्महत्या केल्याचा प्रकार बुधवार दि.५ मार्चला दुपारी १२ वाजताच्या दरम्यान उघडकीस आला.

सदर माहितीनुसार जुने घरमालक मधुकर ढोके यांच्या त्रासाला कंटाळून दुसऱ्या ठिकाणी राहायला गेलेल्या दाम्पत्याशी जुन्या घरमालकाने वाद घालून जीवे मारण्याची धमकी दिली. या भांडणात अपमान सहन न झाल्याने रिना संतोष मांडवकर (२७ ) या महिलेने गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना ५ मार्चला उघडकीस आली असून याप्रकरणी जुने घरमालकांच्या कुटुंबीयातील पाच व्यक्तींना अटक केली.

वरोरा शहरालगतच्या बोर्डा ग्रामपंचायत हद्दीतील रामवाटिका वसाहतीत संतोष दिलीप मांडवकर व त्यांची पत्नी रीना किरायाने राहत होते. ५ मार्च रोजी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास संतोष मांडवकर दुकानातील काम आटोपून जेवण करायला घरी गेले असता, त्यांची पत्नी रीना (२७) ही पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकलेली दिसली. ही माहिती त्यांनी नातेवाईक व पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. दरम्यान, रीनाने आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी पती संतोष यांना बेड जवळ आढळून आली. यात माझ्या आत्महत्येला माझे पती व माझ्या परीवारातील कोणीही जबाबदार नसुन घरमालक ढोके परीवारातील सर्व जबाबदार असल्याचे लिहिले आहे.

त्यातील लिहिलेल्या मजकुरावरून रीनाने ४ मार्च रोजी जुन्या घरमालक दाम्पत्यांसोबत झालेल्या वादातून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. यामुळे रीनाचा पती संतोष दिलीप मांडवकर यांनी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास पोलीस स्टेशन गाठून जुन्या घरमालक दाम्पत्यासह मुलगी,पत्नी मुलगा व सून यांच्या विरोधात तक्रार देऊन रीनाच्या आत्महत्येला हे सर्व जबाबदार असल्याचा आरोप केला.
संतोषने तक्रारीत म्हटल्याप्रमाणे तो व पत्नी रिना बोर्डा परिसरातील मधुकर ढोके यांच्या घरी किरायाने राहत होते. परंतु, घरमालकांसोबत वारंवार वाद होत असल्याने त्यांनी २० फेब्रुवारीला सदर घर सोडून बोर्डा ग्रामपंचायत हद्दीतील रामवाटिका वसाहतीत किरायाने घर घेतले. यानंतर ४ मार्चला सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास जुने घरमालक मधुकर ढोके व त्यांची पत्नी, मुलगी यांनी तिथे येऊन भांडण केले आणि जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर मधुकर ढोके यांचा मुलगा धीरज व त्याची पत्नीने फोनवरून आणखी भांडण उकरून काढून रीनाला अपमानित केले. त्यामुळे रीना ने आत्महत्या केली असा आरोप संतोष मांडवकर यांनी केला. पण संतोष मांडवकर यांनी पोलीसात तक्रारकरुनही वरोरा पोलीस काहिच हालचाल करीत नसल्याचे लक्षात आले कारण मधुकर ढोके हा सेवानिवृत्त आय पी एस अधिकारी असल़्याने ढोके हे कदाचित पोलीसावर दबाव आणत असवा असा दाट संशय येताय संतोष यांनी नाभिक समाजाती काहि कार्यकरत्यांना माहिती दिली. असता महाराष्ट्र नाभिक मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी ऐकत्र येवुन पोलीस स्टेशन वरोरा येथे आक्रमक होऊन पोलीसांना या प्रकरणी जाब विचारले असता वरोरा पोलीसांनी यांचे गांभिर्य ओळखुन या तक्रारीवरून पोलिसांनी मधुकर ठोके यांची पत्नी व मुलगी मुलगा धीरज धोके व त्यांची पत्नी अशा पाच जनावर भारतीय दंड संहिता २०२३च्या कलम १०८,३५२,३५१, (२),३९१(४),३(५) अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.

याप्रकरणी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे कार्यकर्त्यानी निवेदन दिले असतात पोलीसानी सात दिवसांत अधीक तपास करुन कठोर शिक्षा देण्यात येण्याचे सांगितले यावर कार्यकर्त्यांनी या सात दिवसात कारवाई न झाल्यास महाराष्ट्र नाभिक महामंडळ आक्रमक तिव्र आंदोलन करेल असा इशारा निवेतनातुन देण्यात आला. यावेळी उपस्थित शशिकांत नक्षीणे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष, रविंद्र येसेकर जिल्हा अध्यक्ष चंद्रपुर, सचिन नक्षिणे युवा जिल्हाध्यक्ष चंद्रपुर,ज्ञानेश्वर जुनारकर, होमराज घुमे शेगाव, नानाभाऊ कडुकर, अविनाश क्षिरसागर, कार्तिक वाटेकर, राजु बनसोड, नामदेव जुनारकर व अन्य कार्यकर्ते होते.
आरोपी याच्यावर कारवाई करण्यास पुढील तपास वरोरा पोलीस करित आहे.