• ज्येष्ठ समाजसेवक डॉ.विकास आमटे यांना पुण्यधाम मानवता सेवा पुरस्कार
सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनिधी, वरोरा
वरोरा : वैद्यकीय डॉक्टर आणि जेष्ठ समाजसेवक डॉ.विकास आमटे हे महारोगी सेवा समिती वरोरा चे प्रमुख आहेत.ही संस्था कुष्ठरोगाने ग्रस्त लोकांसाठी एक अग्रगण्य संस्था आणि एक सर्वोच्च गैरसरकारी रेफलर सेंटर आहे. कुष्ठरोग्यांच्या रुग्णावर उपचार आणि पुनर्वसन करणे आणि उत्पादक कामाद्वारे त्यांना सन्मानाने आणि स्वाभिमानाने जीवन देणे या मूलभूत उद्देशाने १९४९ मध्ये त्यांचे वडील मुरलीधर देविदास उर्फ बाबा आमटे यांनी एम एस एस ची स्थापना केली.आनंदवन म्हटले की पहिली नावे येतात ती बाबा आणि साधनाताईचे ते स्वाभाविकच आहे.कारण या विशाल कुटुंबाचे ते माता – पिताच ! पण त्यानंतर आनंदवन वासियांच्या हिताचा सांभाळ जागलेपणाने कोणी केला.असेल तर तो ‘ विकासभाऊंनी ‘ आनंदवनातील कुष्ठरुग्णांचे डॉक्टर या नात्याने उपचार करत त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणारे,व्यवसाय कौशल्य त्यांना मिळवून देत बाबांचे स्वलंबनाचे तत्वही अमलात आणले.छपाई काम,शिवणकाम ,फर्निचर निर्मिती,विविध प्रकारच्या कापडाचे उत्पादन ,चप्पल व
बॅगाची निर्मिती इत्यादी दैनंदिन जीवनातील सगळ्या गरजा भगवणारा कार्यशाळेचा पसारा उभारला.ग्रीटिंग कार्ड ,पोस्टर ,लाकडी वस्तू अशा कलाकुसरीच्या गोष्टी तयार करून आनंदवन निवासिंच्या कलेला वाव मिळवून दिला.
याचाच पुढचा टप्पा म्हणता येईल असा स्वरानंदवन या नावाने प्रसिद्ध झालेला वाद्यवृंद विकसित करून तो स्थिरावला असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.अनंदवनाबरोबर संस्थेच्या इतर प्रकल्प उभारणीत योगदान दिले. झरी – जामनी येथे जाऊन तिथल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना पाण्याची शाश्वत व्यवस्था उभी करून देऊन शेतीच्या दोन हंगामाची सोय करून दिली आणि त्या गावांवर उभारलेल्या पाणी व्यवस्थेची जबाबदारी सोपविली.
डॉ.विकास आमटे यांच्या कार्याची व्यापकता लक्षात घेऊन बाबा आमटे यांच्या महारोगी सेवा समिती आनंदवन या संस्थेला ७५ वर्ष पूर्ण झालीत .बाबा आमटे यांचे जगप्रसिद्ध कार्य त्यांच्या पश्चात अव्याहत ,कल्पकतेने, विकासाच्या वेगाने डॉ.विकास आमटे यांनी संचालकत्व स्वीकारले.कार्य पुढे नेले त्यासाठी त्यांना एक लाख रुपये,मानपत्र शिल्ड असा मानवता सेवा पुरस्कार पुण्यधाम आश्रम कोंढवा पिसोली पुणे चे वतीने प्रदान करण्यात आला.सदर पुरस्कार समारोहला डॉ.विकास आमटे काही कारणास्तव जाऊ शकले नाही.परंतु त्यांचा पुरस्कार महारोगी सेवा समितीचे विश्वस्त सुधाकर कडू यांनी स्वीकारला.
समारोहला मुख्य अतिथी डॉ.पी. डी.पाटील ,प्रमुख वक्ते ,प्रसिद्ध पत्रकार, स्थंभलेखक ,राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे,प्रतिष्ठित उपस्थिती पद्मभूषण डॉ.विजय भटकर,अध्यक्ष व विश्वस्त पुण्यधाम संस्था पुणे सदानंद शेट्टे,शशिकांत पागे,सर्व विश्वस्त.व पुण्यधाम आश्रमवासिय उपस्थित होते.