दिपक नक्षिणे यांना समाज भुषण पुरस्काराने सन्माननीत
राजेश येसेकर : तालुका प्रतिनिधी भद्रावती
भद्रावती : महाराष्ट्र नाभिक महामंडळ शाखा वणी येथे नुकताच शेतकरी मंदिर येथे नाभिक समाजाचा उपवधू वर परिचय मेळावा आयोजीत करण्यात आला होता यावेळी दिपकभाऊ नक्षिणे यांना समाज भुषण पुरस्कार देण्यात आला.
हा पुरस्कार महाराष्ट्र नाभिक महामंडळ नेहमीच समाज कार्यात चांगल्या संकल्पनांना वर्षानुवर्षे प्रोत्साहित करीत असतात नवसंकल्पना आणि उमेदिने वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या समाजातील जेष्ठांच्या व तरुणांच्या कामगिरीचा गौरव करण्यासाठी महाराष्ट्र नाभिक महामंडळ तर्फे पुरस्कार देण्यात येतात. दिपकभाऊ नक्षिणे यांनी अवघ्या विस – बाविस तरुण वयापासुन १९८५ पासुन महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हा अध्यक्ष श्री. हरीभाऊ चौधरी यांच्या मागदर्शनात समाज कार्याची सुरुवात केली. हरीभाऊ चौधरी यांनी मला समाज कार्याबध्दल बरीचशी माहिती दिली व मला समाजाचे कार्य करण्यास प्रोत्साहन दिले. त्याच वर्षी श्री. संत नगाजी महाराज उत्सव सामीतीचे कोषाध्यक्षची जबाबदारी दिली. असल्याचे सांगितले १९९० ला. नाभिक सेवा संघाचे संस्थापाक अध्यक्ष रविंद्र येसेकर यांनी नाभिक सेवा संघाचे चंद्रपुर जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती केली. २०१४ ते २०२१ पर्यंत यांनी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हा अध्यक्ष पद उत्तम रित्या सांभाळले दिपकभाऊ यांच्या समाजकार्य करण्याची शैली, शांत स्वभाव, समजुदार पणा, कार्यकर्ते टिकवून ठेवण्याची पध्दत त्यांना समज देणे यांच समाजकार्याचा अनुभवांची दखल घेऊन मा. श्री. कल्याणजी दळे साहेब महाराष्ट नाभिक महामंडळ प्रांताध्यक्ष यांच्या हस्ते यांना समाज भुषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमातचे अध्यक्ष म्हणुन कल्याणजी दळे महाराष्ट्र नाभिक महामंडळ प्रांताध्यक्ष, कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून राजेंद्र भाऊ नागपुरे यांच्या हस्ते झाले .या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी गजाननराव वाघमारे अमरावती विभागीय अध्यक्ष व निवृत्ती पिस्तूलकर सर निळकंठराव तायडे अमरावती विभाग व्यासपीठावर सर्व मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे यशस्वीते करीता शशिकांत उर्फ गुड्डू नक्षणे महाराष्ट्र नाभिक मंडळाच्या यवतमाळ जिल्हा अध्यक्ष व त्यांची संपूर्ण टीमने सहकार्य केले.
या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.
यावेळी सर्वश्री डुडुभाऊ नक्षीणे, दिलिपभाऊ वानकर, दिपकभाऊ नक्षिणे, रविंद्र येसेकर, सचिन नक्षिणे, हरीश घुमे, हणुमान नक्षिणे, सागर घुमे, पियुष घुमे, पांडुरग हणुमंते, बंडु व्ही लांडगे, नितिन नागमोते, होमराज घुमे शेगाव राजेश येसेकर निळकंठराव तायडे नेर, व सर्व समाज बांधव यांनी अभिनंदन करुन पुढिल कार्याच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
मला समाज भुषण पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. हिच माझ्या कामाची पावती समजुन मी हा पुरस्कार स्वीकारला व श्री. शशीकांत नक्षिणे महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा अध्यक्ष यवामाळ यांचे मन:पुर्वक आभार मानले.
