Home Breaking News भांदेवाडा येथे सद्गुरू जगन्नाथ बाबा जन्मोत्सव व रामनवमी सोहळा होतोय साजरा!

भांदेवाडा येथे सद्गुरू जगन्नाथ बाबा जन्मोत्सव व रामनवमी सोहळा होतोय साजरा!

394

भांदेवाडा येथे सद्गुरू जगन्नाथ बाबा जन्मोत्सव व रामनवमी सोहळा होतोय साजरा!

सुवर्ण भारत:प्रियंका गायकवाड, प्रतिनीधी,चंद्रपूर

चंद्रपूर : श्रीक्षेत्र भांदेवाडा येथील ‘ब’ वर्ग तिर्थक्षेत्र असलेल्या विदेही सद्गुरू जगन्नाथ बाबा संस्थानात सद्गुरू जगन्नाथ बाबा यांचा जन्मोत्सव व रामनवमी उत्सव सोहळा दिनांक 30-03-2025 ते 06-04-2025 गुढीपाडवा ते रामनवमी पर्यंत साजरा करण्यात येणार असल्याचे देवस्थान कमिटी तर्फे कळविण्यात आले आहे.

गुढीपाडवाच्या दिवशी सकाळी 9.16 वाजता सद्गुरूबंधु वसंतराव झोलबाजी धानोरकर यांचे हस्ते घटस्थापना व गुढी उभारण्यात येणार आहे.

नित्य दैनिक संगीतमय श्रीमद भागवत व विदेही सद्गुरू जगन्नाथ बाबा कथा सप्ताह भागवतप्रवक्ते ह. भ. प. प्रशांत महाराज भोयर (झरीजामनी ) यांच्या सुमधुर वाणीतून होणार आहे. या शिवाय रोज सकाळी काकडआरती, भागवत कथा पारायण तसेच सायंकाळी हरिपाठ आणि त्यानंतर किर्तन, भजन आदिं कार्यक्रम होणार आहे.

रामनवमीच्या अगोदरच्या दिवशी येणाऱ्या पालख्यांची पूजा तसेच सायंकाळी ह.भ.प. सुरेश महाराज तरवटकर यांचे सृश्रव्य किर्तन!

रामनवमी दिवशी सकाळी सद्गुरू जगन्नाथ बाबा यांचा पालखी सोहळा पूजा!
दुपारी 12 वाजता सद्गुरू जगन्नाथ बाबा जन्मोत्सव सोहळा काल्याचे किर्तन, दहीहंडी व आरती करण्यात येईल .त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात होणार आहे.

सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.