#Ballarpur
•दृष्टीहीन कलावंतांचा आर्केस्ट्रा संपन्न. श्रोतावर्ग झाले मंत्रमुग्ध
सुवर्ण भारत: विशाल डुंबरे
प्रतिनिधी,चंद्रपूर
बल्लारपूर: दृष्टीहीन जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, बल्लारपूर तर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती प्रित्यर्थ अंध कलावंतांचां संगीतमय कार्यक्रमाने श्रोतावर्ग मंत्रमुग्ध झाले. 29 मार्चला बल्लारपूर येथील राजे खांडक्या बल्लाळशाह नाट्य सभागृहात हा कार्यक्रम घेण्यात आला. दृष्टिहीन असणे हे मानवी जीवनाला एक खूप मोठं फिजिकल चॅलेंज असते.तरीसुद्धा असे व्यक्तिमत्व आपल्यातली कमतरता दूर सारून कलागुणांना आत्मसात करतात. अशा लोकांना धैर्य आणि हिम्मत देण्याकरिता ही संस्था कार्यरत आहे.या कार्यक्रमात आशियाई रेकॉर्ड करणारी 16 वर्षीय अंध जलतरण पटू ईश्वरी पांडे हिचा सत्कार करण्यात आला. मागील अनेक वर्षापासून दृष्टीहीन जनकल्याण बहुउद्देशीय संस्था कार्यरत आहे .प्रत्येक वर्षी आर्केस्ट्रा च्या माध्यमातून अंध कलावंतांना एक अनोखा मंच उपलब्ध करून देते. ऑर्केस्ट्रा मेलोडी हा डेअर संस्था नागपूर द्वारा प्रस्तुत करण्यात आला .
कार्यक्रमाच्या उद्घाटना प्रसंगी अध्यक्ष स्थानी दिलीप गेडाम होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रेमानंद खंडाळे, बल्लारपूर पेपर मिल चे जनरल मॅनेजर सतीश मोहन, सामाजिक कार्यकर्ता सरोज बद्दलवार, अरुण लाडे, रीता लाडे यांनी दृष्टीहीन कलावंतांना शुभेच्छा देत मार्गदर्शक केले . सतीश शेंडे यांच्या संयोजनात संस्थेचे अध्यक्ष दिलीप गेडाम ,कोषाध्यक्ष लालसरे मॅडम, सचिव शालिनी रामटेके यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.तसेच रमेश बावणे निलेश कुकुटकर संगीता शेंडे भूपेश रामटेके श्रद्धा शेंडे ,गौरी शेंडे यांनी अथक परिश्रम करून मोलाचे सहकार्य केले.
