#chandrapur चंद्रपूरच्या बाबूपेठ प्रभागात पाणी समस्या गंभीर – भाजपचे मनपा आयुक्तांना निवेदन सादर!
सुवर्ण भारत:किरण घाटे (विशेष प्रतिनिधी)
चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील बाबुपेठ प्रभागात दिवसेंदिवस पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होत चाललेली आहे नळाला पाणी फारच कमी येत असून त्यातच या भागातील नळ नियमित येत नाही . त्यामुळे स्थानिक नागरिकांना उगिच त्रास सहन करावा लागत आहे.उन्हाळ्यात ही समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.या बाबतीत मनपा प्रशासनाने तातडीने पाऊले उचलत नागरिकांना पिण्याच्या पाण्याची मुबलक प्रमाणात व्यवस्था करुन देण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते रूपेश पांडे यांनी चंद्रपूर मनपा आयुक्तांना केली .या वेळी अभिलाष दुबे, प्रफुल डफ ,अभिनेश इम्मड़ी ,विनोद नलें,राहुल शुक्ला उपस्थित होते.
