#Etaplli
• एटापल्लीत पार पडला आम्ही सावित्रीच्या लेकी समूहाचा सांस्कृतिक कार्यक्रम!
सुवर्ण भारत:किरण घाटे (विशेष प्रतिनिधी)
गडचिरोली : एटापल्ली येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या

प्रांगणात नुकताच लॉर्ड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड यांच्या नेतृत्वात आम्ही सावित्रीच्या लेकी समूहाच्या वतीने महिला सांस्कृतिक कला महोत्सव व सत्कार कार्यक्रम पार पडला.
सदरहु कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर सोनल कोवे यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कुमारी तनुश्रीताई आत्राम यांनी विभूषित केले होते.
आम्ही सावित्रीच्या लेकी समूहाचे सदस्य व तसेच समाज भूषणाने सन्मानित झालेल्या सुनिता चांदेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण केले. लाॅयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड मुळे तरुणांना रोजगार मिळाला .
महिला सक्षम झाली पाहिजे अशी भावना त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली.कार्यक्रमाला पीएसआय, अश्विनी नागरगोजे वनपरिक्षेत्र अधिकारी निलीमा खोब्रागडे .डॉक्टर प्रीती बुरीवार डॉक्टर प्रेरणा रॉय ,वैद्यकीय अधिकारी ज्योती डोके, अधिवक्ता सरिता राजकोंडावार उपस्थित होत्या.
या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनीता चांदेकर,शालिनी नैताम,गुलशन शेख, वंदना उपगन्लावार,कालीमा शेख,रेहाना शेख,निर्मला हिचामी,सरिता गावडे यांनी अथक परिश्रम घेतले.