Home Breaking News #Rajura “त्या”भ्याड हल्ल्याचा राजू-यात अनेक संघटना कडून जाहीर निषेध

#Rajura “त्या”भ्याड हल्ल्याचा राजू-यात अनेक संघटना कडून जाहीर निषेध

185

#Rajura “त्या”भ्याड हल्ल्याचा राजू-यात अनेक संघटना कडून जाहीर निषेध

सुवर्ण भारत:किरण घाटे (संपादक)

राजुरा:पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी भ्याड हल्ल्याच्या राजूरा शहरात जाहीर निषेध करण्यात आला. विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून संविधान चौक येथे एका निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. या निषेध सभेत रोटरी क्लब राजुरा यांनीही आपलाही सहभाग नोंदविला. तद्वतच या हल्ल्यात मृत्युमुखी पावलेल्या सर्व हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली . ज्या कुटुंबांनी आपल्या कुटुंबाचा आधार गमावला त्यांना धीर देण्यात आला. तसेच असा हल्ला यापुढे होऊ नये यासाठी सरकारने खबरदारी घ्यावी अशी भावना रोटरी क्लब राजुराचे अध्यक्ष सारंग गिरसावळे यांनी आपल्या संवेदनांमध्ये व्यक्त केली.

या निषेध सभेमध्ये रोटरी क्लब राजुराचे अध्यक्ष सारंग गिरसावळे, उपाध्यक्ष अमजद भाई खान, माजी अध्यक्ष कमल बजाज, सदस्य राजूभाऊ गोखरे, अधिवक्ता जीवन इंगोले, किरण ढुमणे, प्रा. डॉ. गणेश पेटकर, डॉ. अमोघ कल्लुरवार, आनंद चांडक, किशोर हिंगाणे ऍड. मेघा धोटे, अलका सदावरते,प्रा. रामभाऊ डोरलीकर आदिं सहभागी झाले होते.