Home Breaking News •घुग्घुस लॉयड्स इन्फीनाईट फाउंडेशन तर्फे दिव्यांग ,ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य साहित्य वितरण

•घुग्घुस लॉयड्स इन्फीनाईट फाउंडेशन तर्फे दिव्यांग ,ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य साहित्य वितरण

89

#Ghugus

• घुग्घुस लॉयड्स इन्फीनाईट फाउंडेशन तर्फे दिव्यांग ,ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य साहित्य वितरण

सुवर्ण भारत: पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी,चंद्रपूर

चंद्रपूर:लॉयड्स इन्फीनाईट फाउंडेशन आणि लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने वढा ग्रामपंचायत मध्ये दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य साहित्य वाटप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात व्हीलचेअर, आराम खुर्ची, आधार काठी, शौचालय चेअर, अशा विविध प्रकारच्या आरोग्य साहित्याचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन ग्राम पंचायत वढा चे सरपंच किशोर वरारकर यांच्या हस्ते झाले.
ग्रामपंचायत वढा येथील प्रमुख पाहुणे म्हणून ग्राम पंचायत सदस्य सुरेश वरारकर,लॉयड्स इन्फीनाईट फाउंडेशनचे अधिकारी अनुराग मत्ते,आशावर्कर सविताताई पडाल,यांच्या उपस्थिती होती.
या कार्यक्रमात एकूण ४१ दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये व्हीलचेअर, आराम खुर्ची, आधार काठी, शौचालय चेअर यांचा समावेश होता.
या उपक्रमाबद्दल माहिती देताना अनुराग मत्ते म्हणाले की, “दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात सुधारणा करणे हे आमचे सामाजिक दायित्व आहे. लॉयड्स इन्फीनाईट फाउंडेशन आणि लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड नेहमीच अशा उपक्रमांना पाठिंबा देण्यासाठी तत्पर असतात.”
सरपंच किशोर वरारकर यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले आणि म्हणाल्या, “या आरोग्य साहित्यामुळे गावकऱ्यांच्या जीवनात मोठा बदल होईल. ग्रामपंचायत नेहमीच अशा सामाजिक कार्यांना प्रोत्साहन देत राहील.”
कार्यक्रमाचे संचालन श्रीरंग पोतराजे यांनी केले तर आभार प्रदर्शन शीतल कौरासे, यांनी केले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंजुषा वडस्कर, सौ.लता बावणे, सौ. मनीषा बरडे यांनी अथक प्रयत्न केले.
या कार्यक्रमामुळे दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा आधार मिळाला आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद या उपक्रमाची यशस्विता दर्शवत होता.