#Ghugus
• सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात महात्मा जोतिबा फुले जयंती साजरी
• महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला : विवेक बोढे
सुवर्ण भारत:पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर
घुग्घुस: सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात शुक्रवार, ११ एप्रिल रोजी सकाळी थोर समाजसुधाकर आणि महिलांच्या शिक्षणासाठी आग्रही असणारे महात्मा जोतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
याप्रसंगी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांनी महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले.
मनोगत व्यक्त करतांना भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे म्हणाले, महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला. महात्मा जोतिबा फुले यांनी सामाजिक प्रबोधन, अस्पृश्यता व जातिव्यवस्थेचे निर्मूलन आणि स्त्रियांना शिक्षण देण्याचे कार्य केले.
यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे, अशोक मंथनवार, उमाकांत आरमुल्ला, रामदास कुळमेथे, रोशन कुळमेथे, नानेबाई मोहितकर, कलावती खामणकर, शीतल खोबरे, सुमन देरकर, उषा ढाक, बंडू निभ्रड, संदीप तेलंग, उमेश दडमल, राकेश उरकुडे, हनुमान खडसे, खुशबू मेश्राम, भारती परते, नेहा कुम्मरवार, स्वाती गंगाधरे, प्रिया नागभीडकर, किरण बोरुले, जाई आत्राम आदींची उपस्थिती होती.
