#varora
• वरोरा एसटी डेपो मध्ये आग
• अग्निशमन दलाला पाचारण करून वेळीच आग आणली आटोक्यात
सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनिधी, वरोरा
वरोरा:वरोरा तालुक्यात सतत आगीचे तांडव सुरू असून वंधली शेतशिवारात आगीने तीन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान केले.आगीचे तांडव संपता संपत नाही तर एस टी डेपो चे बाजूला वनविभागाची जागा लागून आहे.त्याठिकाणी गार्डनचा प्रोजेक्ट सुरू आहे.त्यामुळे जागा स्वच्छ करण्याचे दृष्टीने साफसफाई व कचरा वैगरे जाळण्याचे काम सुरू आहे.त्याच आगीची झळ लागूनच असलेल्या एस टी डेपो मधील असलेल्या कचर्यापर्यंत पोहचली.आणि त्याठिकाणी सुद्धा आगीचे स्वरूप निर्माण झाले.असे डेपो व्यवस्थापक वर्धेकर यांची माहिती आहे.पाहता – पाहता आगीचा तांडव सुरू झाला असता घटनेची माहिती युवासेना जिल्हाप्रमुख आलेख रट्टे यांना पोहचताच त्यांनी तात्काळ तालुका प्रमुख प्रणव पारेलवार यांच्याशी संपर्क करून सूचना दिल्या.त्यांनी आपल्या टीम सह घटनास्थळ गाठले.आगीचे घटनेपासून 30 फुटावरच डिझेल पंप होता.परंतु युवासेनेचे सहकार्याने मोठा अनर्थ टळला.तसेच डेपो व्यवस्थापक व इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समयसूचकता ठेऊन तात्काळ पोलिसांना व युवासेनेचे कार्यकर्त्यांना घटनेची माहिती दिली असता पोलीस विभागांनी साई वर्धा पॉवर कंपनी व न.प.वरोरा
च्या अग्निशमन दलाला पाचारण करून आगीवर नियंत्रण मिळविले.घटनेचे गांभीर्य लक्षात घेता युवासेना चे तालुका सचिव रितिक जाधव,प्रतीक जाधव,संकेत वानी,आणि अमित भाऊ या कार्यकर्त्यांनी प्रसंगावधान राखून सामाजिक बांधिलकी जोपासून मोठी दुर्घटना टाळली.सदर घटना 11 एप्रिल 2025 ला दुपारी 3.30 चे दरम्यान घडली.