Home Breaking News #Varora • माळी समाज सेवा मंडळ वरोरा तर्फे महात्मा ज्योतिबा फुले...

#Varora • माळी समाज सेवा मंडळ वरोरा तर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती वरोरा शहरात साजरी

209

#Varora

• माळी समाज सेवा मंडळ वरोरा तर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती वरोरा शहरात साजरी

सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर 
तालुका प्रतिनिधी,वरोरा

वरोरा : वरोरा तालुका माळी समाज सेवा मंडळ वरोरा तर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती वरोरा शहरात साजरी करण्यात आली .यावेळी आमदार करण देवतळे हे प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांचे हस्ते प्रतिमेचे पूजन करून ,आपल्या मार्गदर्शनातून महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. यावेळेस मंडळाचे अध्यक्ष राजू डोंगरे केशवराव लोते, गोपाळराव निंबाळकर ,प्रमोद डोंगरे ,पुंजाराम डोंगरे, विठ्ठलराव बोबडे, विनोद धाकुलकर ,रमेश लांजेवार ,विलास सपाटे ,गणेश लांजेकर ,डॉक्टर पवन डोंगरे, बाबू दशरथ शेंडे, पिंपळशेंडे सर बंडू डोंगरे उपस्थित होते याप्रसंगी बोलताना आमदार करण देवतळे यांनी माळी समाजाचे उत्थान होण्यासाठी समाजाला सहकार्य व मदत करण्याचे आश्वासन दिले व महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य अमूल्य असून त्यांच्या कार्याची सामोर जनजागृती करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.