Home Breaking News #Chandrapur • विदर्भ किसान मजदूर काँग्रेस तर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जंयती दिनी...

#Chandrapur • विदर्भ किसान मजदूर काँग्रेस तर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जंयती दिनी माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांच्या मार्गदर्शनात आदरांजली वाहीली.

293

#Chandrapur
• विदर्भ किसान मजदूर काँग्रेस तर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जंयती दिनी माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांच्या मार्गदर्शनात आदरांजली वाहीली.

सुवर्ण भारत:शंकर महाकाली(संपादक)

चंद्रपूर:भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती संपूर्ण देशात अतिशय उत्साहाने साजरी केली जात आहे, या पवित्रदिनी माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांच्या मार्गदर्शनात व युवा नेते राहूलबाबू पुगलिया यांच्या नेतृत्वात विदर्भ किसान मजदूर कॉंग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यासह गांधी चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला मालार्पण करूण आदरांजली वाहिली तसेच सोबतच्या सर्वांनी मालार्पण तथा पुष्पार्पण करूण आंदरांजली वाहिली.
आज विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३४ व्या जयंती प्रित्यर्थ संपूर्ण भारतवासी या महामानवाला कृतज्ञतापूर्वक आदरांजली वाहत आहेत. देशातील काही नेते देशाला काही देऊन जातात. डॉ. बाबासाहेबांनी देशाला अनमोल असे संविधान दिले. या संविधानामुळेच ७५ वर्षानंतर सुध्दा भारत देशातील लोकतंत्र सुचारू पध्दतीने चालू आहे. लोकतंत्राला माननेवाले संविधान बदलण्याचा विचार ही मनात आणू शकत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील गोरगरीब, दलित, वंचितांच्या जीवनाच्या उध्दारासाठी फार मोठे योगदान दिले आहे. तसेच संविधाना सोबतच ग्रामस्तरापासून तर देशस्तरापर्यंत संविधनाच्या माध्यमातून विकासाच्या अनेक योजना राबविण्याची प्रेरणा डॉ. बाबासाहेबांनी दिली. ते आदर्श व प्रेरणा आपण आपल्या हृदयात कायमची जोपासली पाहिजे. बाबासाहेबाच्या जयंतीनिमित्य आपण त्यांच्या विचारांना उजाळा देऊ त्यांचे कार्य पुढे नेऊ आणि शिक्षण, समता, बंधूता या मुल्यांवर चालणारा भारत घडवण्याचा निर्धार करू.
या आदरांजली कार्यक्रमाप्रसंगी विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचे ग्रामिण जिल्हा महासचिव तथा माजी नगरसेवक अशोक नागापूरे, शहर अध्यक्ष तथा माजी नगरसेवक देवेंद्र बेले, कामगार युनियनचे चंद्रशेखर पोडे, माजी नगरसेवक श्रीनीवास पारनंदी, सुधाकरसिंग गौर, पंकज गुप्ता, बाबुलाल करूणाकर, रतन शिलावार, कामगार नेते विरेंद्र आर्य, अनिल तुंगीडवार, सुदर्शन पुल्ली, सुनिल बकाली, मुर्लीधर चौधरी, हेमंत आक्केवार,राजु लहामगे, प्रतिक तिवारी, पृथ्वी जंगम, सुमित नगराळे, श्रीनिवास जेट्टी, सतिश विजलपूरे, आतिश आक्केवार, सतिश नेवटला, शेखर कोतपल्लीवार, श्रीकांत उप्पलवार, महेश ठोंभरे, अंकुश नारलावार, सुनिल दुधे, विनोद दुधे, दिलीप डोंगे, मो. फरिद, अविनाश मेश्राम, उपस्थित होते.