संयोजिकापदी नाशिकच्या चैताली आतराम यांची निवड तर सहसंयोजिकापदी चंद्रपूरच्या कविता जुमडे यांची नियुक्ती!
चंद्रपूर: किरण घाटे
सामाजिक ,साहित्यिक, शैक्षणिक, क्रीडा, व कला क्षेत्रातील कर्तृत्ववान महिला व तरुणींना सदैव प्रोत्साहन देणा-या महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं मेरी आवाज सुनो या व्हाॅट्सअप गृपच्या मुख्य संयोजिका पदी नाशिक जिल्ह्यातील शहापूर येथील समाजसेविका चैताली निलेश आतराम यांची निवड करण्यात आली आहे.तर याच गृपच्या सहसंयोजिकापदी चंद्रपूर शहरातील महिला सामाजिक कार्यकर्त्या कविता जुमडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या दोन्ही नियुक्या सहज सुचलं नागपूरच्या मुख्य मार्गदर्शिका समाजसेविका व योग शिक्षिका मायाताई कोसरे, राजूराच्या जेष्ठ साहित्यिक अधिवक्ता मेघा धोटे व अमरावती जिल्ह्यातील पुरस्कार प्राप्त जेष्ठ लेखिका विजया भांगे यांनी आज संध्याकाळी केल्या आहेत.
चैताली आतराम ह्या चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील गोजोली गावच्या रहिवाशी असून सध्या त्यांचे वास्तव्य नाशिक जिल्ह्यात आहे त्यांनी
एम ऐ मराठी पर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे.तर सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणाऱ्या कविता अनिल जुमडे यांचे वास्तव्य चंद्रपूर शहरातील आहे.अनेकांनी चैताली आतराम व कविता जुमडे यांच्या नियुक्तींचे अभिनंदन केले आहे.
