#Chandrapur
• शरणम बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्थाच्या माध्यमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त जिलेबी वितरण.
सुवर्ण भारत: पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधि, चंद्रपूर
चंद्रपूर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शरणम बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्थाच्या वतीने या संस्थेचे चे संस्थापक/ अध्यक्ष शेखर तावाडे यांच्याकडून या पावन प्रसंगी सिस्टर कॉलनीच्या मुख्य मार्गावर डॉक्टर सुधीर मते यांच्या दवाखान्यासमोर जिलेबी वितरणाचे कार्यक्रम घेण्यात आले.
सर्वप्रथम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला साप्ताहिक कलम मांगे इन्साफ चे मुख्य संपादक सय्यद रमजान अली यांनी दीप प्रज्वलन करून पुष्पमाला अर्पण केली.
तदनंतर जिलेबी वितरणाचे कार्यक्रम सुरू करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी एन.ए.रायपुरे, प्रभुदास पुणेकर, सखाराम वनकर, आनंद वनकर, दिलीप होरे, प्रदीप अडकिने, शेखर तावाडे, हर्षित भसारकर, अभिराज तावाडे, अमर शेंडे, ऋतुराज तावाडे, सतीश नगराळे, प्रमोद तंगमवार सह अनेक मान्यवर या कार्यक्रमाप्रसंगी हजर होते.
शेखर तावाडे यांच्या आई उर्मिला तावाडे यांच्या स्मृती प्रीत्यर्थ हे कार्यक्रम घेण्यात आले असून मागील 10 वर्षांपासून या संस्थेच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविले जात आहे.
स्पर्धा परीक्षा ची तयारी करणाऱ्या गरीब होतकरू विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप देखील अनेक वेळा शरणम बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले.


