
#Chandrapur
• 25 एप्रिल रोजी पालकमंत्री चंद्रपुरात
दैनिक जागर मराठी: पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
चंद्रपूर : राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके हे 25 एप्रिल रोजी चंद्रपूर येथे येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
25 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10 वाजता वन अकादमी येथे आगमन व राखीव, सकाळी 10.30 वाजता चंद्रपूर येथे इरई नदीचे पुनरुज्जीवन व खालीकरण कामाच्या शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी 12.30 वाजता वन अकादमी येथे वन विभागाची आढावा बैठक, दुपारी 2 वाजता गडचिरोली कडे प्रयाण.