Home Breaking News मोरवा-विचोळा परिसरातील गावातील शेती शिवारातून आलेल्या इलेव्हन केव्ही लाईन रस्त्याच्या बाजूने कराअनिल...

मोरवा-विचोळा परिसरातील गावातील शेती शिवारातून आलेल्या इलेव्हन केव्ही लाईन रस्त्याच्या बाजूने कराअनिल डोंगरे प्रदेश मागणी

152

मोरवा-विचोळा परिसरातील गावातील शेती शिवारातून आलेल्या इलेव्हन केव्ही लाईन रस्त्याच्या बाजूने कराअनिल डोंगरे प्रदेश मागणी

सुवर्ण भारत: शंकर महाकाली (संपादक)

चंद्रपूर :तालुक्यातील मोरवा विचोळा तसेच छोटा नागपूर जुनी पडोली,आंभोरा इत्यादी गावातील इलेव्हन केव्ही लाईन शेती शिवारातून गेली असून त्यामुळे पावसाळ्यात या रात्रीच्या वेळी या लाईन मधील बिघाड आल्यास महावितरणच्या अधिकारी, वायरमन यांना त्या भागात जाऊन बिघाड शोधणे तसेच दुरुस्त करण्यास फार अडचणीला सामोरे जावे लागत असतात त्यामुळे दोन,दोन तीन,तीन दिवस लाईन सप्लाय बंद असतात अनिल डोंगरे प्रदेश उपाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र यांनी महावितरणचे अधिक्षक अभियंता सौ.संध्या चिवंडे यांची त्यांच्या ऑफिस मधील जाऊन भेट दरम्यान या विषयावर चर्चा करण्यात आले यावेळी उपकार्यकारी अभियंता अनिल पेंदोर उपस्थित होते. चर्चेदरम्यान शासनाला रस्त्याच्या बाजूला लाईन टाकण्याचा प्रस्ताव पाठवून त्या लाईन रस्त्याच्या बाजूला करू जेणेकरून लाईन दुरुस्त करण्यास विलंब लागणार नाही आणि त्या परिसरातील गावातील लोकांना नाहक त्रास सहन करावा लागणार नाही असे भेटीदरम्यान ठरवण्यात आले.