• किराणा दुकानासह इतर चार दुकानावर चोरट्यांचा डल्ला
• बोर्डा चौकातील घटना
• चार ते पाच दुकानामिळून २१००० रू.चोरट्यांनी केले लंपास
सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनिधी, वरोरा
वरोरा:बोर्डा गाव हा वरोरा लगत असून चौकात येरणे.कॉम्प्लेक्स मध्ये किराणा दुकाणासह इतर व्यावसायिकांची दुकाने आहे.या चौकात ग्राहकांची मोठ्या प्रमाणात रेलचेल असते.रात्री दहा चे दरम्यान आपापली दुकाने बंद करून घरी जातात.१५ मे २०२५ ला सकाळी चोरट्यांनी प्रकाश सुरेश शेंडे यांचे किराणा दुकानाचे शटर उलवून असल्याची माहिती एका गृहस्थाने शेंडे यांना दिली.त्यानंतर शेंडे हे आपल्या दुकानाकडे आले असता त्यांना आपल्या दुकानात ड्रावर मध्ये असलेले रुपये व चिल्लर असे १२००० हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले असे लक्षात आले.त्यांचेच दुकानाजवलील अविनाश ढेंगळे यांचे आरती किराणा स्टोर,राजू चामाटे यांचे किराणा दुकानं ,राजेश लांबट यांचे शिवकृपा प्रोविजन किराणा दुकान,अनंता चौधरी यांचे सलून दुकानाचे शटर उलवून प्रत्येकी ३०००,५००,५५०० रू असे ड्रावर मधून असा एकूण २१००० रू.नगदी व चिल्लर चोरी झाल्याचे कळते.सदर घटना १४ मे २०२५ चे रात्रौ दरम्यान घडली आहे.अज्ञात चोरट्या विरोधात अपराध क्रमांक ३१७/२५ कलम ३२१(४),३०५(A),३(५) वरोरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
सीसिटीव्ही मध्ये अनोळखी चोरटे झाले कैद
शेंडे यांनी आपल्या दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही मिरची पाहणी केली असता त्यामध्ये तीन अनोळखी इसम पंचवीस ते तीस वय असलेले पुरुष दिसून आले.तसेच रात्रौ २.१३ ते २.२५.दरम्यान चोरी केल्याचे दिसून येतआहे.
–– चोरट्यांची टोळी सक्रिय
————+++—————-
अज्ञात चोरट्यांनी बोर्डा चौकातील चार ते पाच दुकाने फोडली.त्यानंतर याच चोरट्यांनी आपला मोर्चा डोंगरगाव रेल्वे या गावाकडे वळविला असा अंदाज वर्तविला जात आहे.कारण तेथील सुद्धा दोन घरी चोरी झाल्याची माहिती आहे.परंतु वृत्त लीहिपर्यंत त्याबाबत सविस्तर माहिती मिळू शकली नाही.परंतु चोरट्यांची टोळी सक्रिय झाली असल्याची चर्चा आहे.
पोलिसांची शोधमोहीम सुरू
भुरट्या अज्ञात चोरट्यांनी चोरी करण्याचे सत्र सुरू केले असून,काही दिवसापूर्वी वरोरा बाजारात एका महिलेच्या बॅग मधून अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने गायब केले आहे.आणि आता एकाच रात्री दुकाने आणि घरे फोडून रोकड घेऊन चोरटे लंपास झाले.लग्नसराई असल्यामुळे नागरिक लग्न समारंभात किंवा अन्य कार्यक्रमाला जात असतात.त्यामुळे चोऱ्या होण्याची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली.त्यामुळे पोलीस विभागांनी सतर्क राहून अज्ञात चोरट्यांचा शोध घेऊन त्यांना जेरबंद करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.पोलीस निरीक्षक तांबडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस चमुनी चोरट्यांना पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू केल्याचे दिसून येत आहे.
