Home Breaking News #Varora • ट्युशनवर नव्हे,शिक्षकावरच ठेवला विश्वास • स्वतः मोलमजुरी करून शिक्षण...

#Varora • ट्युशनवर नव्हे,शिक्षकावरच ठेवला विश्वास • स्वतः मोलमजुरी करून शिक्षण घेणाऱ्या निशाने घेतले 86.00%

323

#Varora
• ट्युशनवर नव्हे,शिक्षकावरच ठेवला विश्वास

• स्वतः मोलमजुरी करून शिक्षण घेणाऱ्या निशाने घेतले 86.00%

सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनिधी, वरोरा

वरोरा : एका गरीब कुटुंबात जन्म घेणारी निशा प्रेमशंकर चव्हाण हिच्या वडिलांची प्रकुर्ती ठीक राहत नसल्याने आई सोबत धुनी भांडी करण्यासाठी जायची.सात ते आठ सदस्यीय कुटुंब,घरात अठरा विश्व दारिद्र्य , शेत जमीन नाही तसेच आर्थिक स्त्रोत नाही. अशाही परिस्थितीत निशा ची तल्लख व कुशाग्र बुध्दी तिने शिक्षणाचा ध्यास धरला.

पुस्तकांशी घट्ट मैत्री केली.आपल्याला शिकून मोठे व्हायचे आहे आणि आपल्या आई वडीलाला आधार द्यायचा ही सप्ने उराशी बाळगून ट्युशनवर नव्हे,शिक्षकांवर विश्वास ठेऊन तिने दहाव्या वर्गात चांगल्या गुणांनी पास व्हायचे यासाठी ध्येयाचा पाठलाग केला.वर्गात शांत बसणे, शिक्षकांचे मार्गदर्शन घेणे,अभ्यासाचा ध्यास ,गृहपाठ पूर्ण करणे हे खरे तिच्या यशाचे गमक होते.कोणत्याही विषयाची शिकवणी वर्ग न लावता तिने विषयांनव्ये शिक्षकांचे मार्गदर्शन घेऊन.

दहावीच्या निकालात 86.00 टक्के गुण घेऊन नेत्रदीपक यश मिळविले आहे.आनंद माध्यमिक विद्यालय,आनंदवन मधून ती प्रथम आली आहे.तिने आपल्या यशाचे श्रेय आई – वडील,मुख्याध्यापिका विद्या गोखरे,आणि सर्व शिक्षकवृंदाना दिले आहे.सर्व शिक्षकांनी तिच्या घरी जाऊन अभिनंदनीय सत्कार केला.महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ.विकास आमटे,डॉ. भारती आमटे ,कौस्तुभ आमटे,पल्लवी आमटे,शाळा व्यवस्थापन कमेटीचे उपाध्यक्ष सुधाकर कडू ,कोषाध्यक्ष सारिका सौसागडे व आदी कमिटी सदस्यांनी अभिनंदन केले आहे.