Home Breaking News #Warora • न.प.चे पाणीपुरवठा अभियंता नागरिकांसाठी ठरले देवदूत • नवीन पाईप लाईन...

#Warora • न.प.चे पाणीपुरवठा अभियंता नागरिकांसाठी ठरले देवदूत • नवीन पाईप लाईन टाकून नागरिकांना स्वच्छ पाणी देण्याचे सत्कर्माचे धनी ठरले अभियंता विशाल कामडी • वरोरा शहरातील नेहरू चौक ते हनुमान मंदिर पर्यंत नवीन. पाईपलाइन टाकण्याचे काम युद्ध पातळीवर

140

#Warora
• न.प.चे पाणीपुरवठा अभियंता नागरिकांसाठी ठरले देवदूत
• नवीन पाईप लाईन टाकून नागरिकांना स्वच्छ पाणी देण्याचे
सत्कर्माचे धनी ठरले अभियंता विशाल कामडी
• वरोरा शहरातील नेहरू चौक ते हनुमान मंदिर पर्यंत नवीन. पाईपलाइन टाकण्याचे काम युद्ध पातळीवर

सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनिधी, वरोरा

वरोरा :शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या काही जुन्या पाईप लाईन असून निकामी झाल्या असल्यामुळे नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा होत नाही.शहरातील नेहरू चौक ते हनुमान वॉर्डात स्वच्छ पाणीपुरवठा होत नव्हता.त्यामुळे बऱ्याच तक्रारी नगरपरिषद ला प्राप्त झाल्या होत्या.त्याअनुषंगाने
नगरपालिकेचे पाणी पुरवठा इंजिनियर विशाल कामडी यांनी नागरिकांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले.प्रथमतः त्यांनी तक्रारीनुसार प्रत्यक्ष हनुमान वॉर्डात जाऊन पाहणी केली.नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर मुख्याधिकारी विशाखा शेळकी यांच्याशी चर्चा केली.तदनंतर.इंजिनियर विशाल कामडी यांनी खूप कमी वेळात नवीन पाईप लाईन टाकण्याचा प्रस्ताव मांडला.आणि तो मंजूर सुद्धा करून घेतला.
नवीन पाईप लाईन टाकून नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा करण्याची इंजिनियर कामडी यांनी आपले प्रशासकीय कार्यातील ध्येय व मनोबल आणि जबाबदारी निश्चित केले.नागरिकांना पिण्यासाठीअस्वच्छ पाणी मिळाले तर आरोग्य बिघडतील, त्यांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावे असा त्यांनी वसा घेऊन मनाशी चंग बांधला.आणि नेहरू चौक ते हनुमान मंदिर पर्यंत नवीन पाईप लाईन टाकण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केले.

नगरपरिषद पाणी पुरवठा विभागाचे इंजिनियर विशाल कामडी हे नागरिकांचे देवदूतच आणि सत्कर्माचे धनी ठरल्याचे नागरिकांकडून प्रतिक्रिया उमटत आहे.