• विकसित कृषी संकल्प अभियान २०२५ -२६ शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवाद साधणार!
• वरोरा तालुक्यातील सहा गावांची निवड
सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनिधी, वरोरा
वरोरा : केंद्रीय कृषिमंत्री,मुख्यमंत्री नागपुरात आले असताना झालेल्या बैठकीत विकसित कृषी संकल्प अभियान २९.मे ते १२ जून २०२५ या कालावधीत ७०० हून अधिक जिल्ह्यामध्ये आयोजित करण्याची नावीन्यपूर्ण योजना आखण्यात आली. सदर योजनेअंतर्गत शास्त्रज्ञांची एक टीम गावोगावी जाऊन शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहे.सदर मोहिमेत ७३१ केव्हीके,११३ आय सी ए आर.संस्था राज्यस्तरीय विभाग आणि कृषी फलोत्पादन ,पशुसंवर्धन , मत्स्यव्यवसाय आणि नावीन्यपूर्ण शेतकरी यांचे अधिकारी सहभागी होतील.शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कृषी टेक्नॉलॉजी बद्दल माहिती देऊन संवाद साधण्यासाठी शास्त्रज्ञांची टीम २ जून २०२५ ला चंद्रपूर जिल्ह्यात येणार आहे.
विकसित संकल्प अभियान २९ मे पासून १० जून पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात सुरू राहणार असून,चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात माढेली,वाघनख,येवती, बारव्हा,मुरदगाव, खांबाडा या गावांची निवड झाली असून शेतकऱ्यांच्या बांधावर शास्त्रज्ञ पोहचणार आहे.शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेणार असून लॅबोरेटरी मध्ये कृषी विषयक ज्या टेक्नॉलॉजी असतात त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाही.याबाबत शास्त्रज्ञ व शेतकरी यांच्यात संवाद होणार आहे.केंद्रीय कृषिमंत्र्यांची पुरस्कृत योजना राबविल्या जात आहे.तसेच शास्त्रज्ञाची दोन टीम येणार असून यामध्ये विज्ञान केंद्र शास्त्रज्ञ, कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ,आत्म्याचे शास्त्रज्ञ उपस्थित राहणार आहे.सोबतच कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहे.
सदर अभियान ७२३ जिल्ह्यातील ६५००० हजार हून अधिक गावांना सहभागी करण्याचे लक्ष ठेवले आहे.यामध्ये १.३ करोड पेक्षा जास्त शेतकऱ्यांना जोडण्याचा संकल्प आहे.
