“माणसाचं चरित्र हेच खरं वैभव” – प्रा. डॉ. प्रशांत महाराज ठाकरे यांचे प्रेरणादायी कीर्तन
सुवर्ण भारत: रविकुमार बंडीवार
तालुका प्रतिनिधी, कोरपना
कोरपना : “माणसाचं चरित्र हेच त्याचं खरं वैभव असून, हेच सर्वात मोठं संपत्ती असते,” असे प्रेरणादायी विचार ह. भ. प. प्रा. डॉ. प्रशांत महाराज ठाकरे यांनी व्यक्त केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कोरपना येथे आयोजित राष्ट्रीय कीर्तनात ते बोलत होते. हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टी, शहर कोरपना यांच्या वतीने शनिवार, दिनांक ३१ मे २०२५ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोरपना येथे संपन्न झाला.
प्रा. डॉ. ठाकरे यांनी आपल्या प्रभावी आणि हृदयस्पर्शी कीर्तनातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करताना समाजाला योग्य दिशा देणाऱ्या थोर व्यक्तिमत्त्वांची महती विशद केली. “चरित्रहीन शिक्षण, पैसा आणि प्रतिष्ठा निरर्थक ठरतात. त्यामुळे प्रत्येकाने चारित्र्यवान होण्याचा प्रयत्न करावा,” असा संदेश त्यांनी दिला.
कार्यक्रमात ह. भ. प. विठ्ठल महाराज डाखरे, ह. भ. प. मिनाथ महाराज पेटकर यांच्यासह भाजप तालुकाध्यक्ष संजय मुसळे, भास्करराव मुसळे, उत्तम मोहितकर, आबिद अली, किशोर बावणे, शशिकांत आडकिने, आशिष ताजने, पुंडलिक उलमाले, नगरसेविका गीता डोहे, सविता तुमराम, आशाताई झाडे, महिला तालुकाध्यक्ष जोशना वैरागडे, सत्यवान घोटेकर, प्रा. संजय ठावरी, इंदिरा कोल्हे, शोभा आगलावे, शांताराम देरकर, सुनील बावणे, सुभाष तुरनकार आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय मुसळे यांनी केले. संचालन भाजपा शहराध्यक्ष अमोल आसेकर यांनी तर आभार प्रदर्शन पवन बुरेवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अँड. पवन मोहितकर, अबरार अली, सुनील देरकर, सचिन डाखरे, जितेंद्र पिंपळकर, अभय डोहे, अतुल आसेकर, लक्ष्मीकांत जाधव, उदय डाखरे, प्रतीक बिडवाईक यांनी अथक परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाला कोरपना शहर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कीर्तनाचा लाभ घेतला.
