#Varora
• ग्रामस्थांच्या तक्रार निवेदनाची प्रशासनाकडून दखल नाही
• सरपंचाच्या भोंगळ कारभारानी त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी ग्रा.प. कार्यालयाला ठोकले कुलूप
सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनिधी,वरोरा
वरोरा : तालुक्यातील कवडशी (बोरगाव) या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी चारगाव धरणात गेल्यामुळे गावाचे पुनर्वसन करण्याकरिता प्रशासनाने सात एकर दिली.यातून.जवळपास पाच एकर जागेवर बोरगाव गाव वसले.उर्वरित जागेवर ग्रामस्थांसाठी प्रशासनाने १४ शौचालय बांधून दिले.परंतु वडधा सोसायटी येथील येथील एका शेतकऱ्याची शेती लागून असल्यामुळे त्याने मार्च महिन्यात जे सी बी.लाऊन १४ शौचालय पाडले आणि अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला .ग्रामस्थांनी वारंवार संबंधित प्रशासनाकडे तक्रारी दिल्या.परंतु पंचायत समिती स्तरावरील कोणत्याही अधिकऱ्यांनी समस्यांची दखल घेतली नाही.त्यानंतर २ जून २०२५ ला उपसरपंच,सदस्यांनी पत्रव्यवहार केला .तरीसुद्धा प्रशासनाला जाग आलीं नाही.आणि कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. आबादी जागेवरील शौचालय पाडून आतिक्रमन करण्यासाठी प्रमोद शेळकी ट्रॅक्टर घेऊन आले परंतु त्यांना ग्रामस्थांनी रोखले.आणि सरपंचाचे अभय या अतिक्रमण धारकाला आहे असा आरोप करून,उपसरपंच ,सदस्य व ग्रामस्थ महिला व पुरुषांनी ग्रां.प. कार्यालयाला ६ जून२०२५ ला सकाळी ११ चे सुमारास कुलूप ठोकले.जोपर्यंत ग्रामस्थांच्या मागण्या पूर्ण होत नाही.तोपर्यंत कुलूप उघडणार नाही ,तसेच यापुढे कुठल्याही शासकीय कर्मचाऱ्याला गावात येऊ न देण्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
घटनास्थळी पोलिस विभाग दाखल झाले होते.त्यांनी ग्रामस्थांचे समस्या ऐकून घेतल्या,आणि निघून गेले.परंतु वृत्त लिहीपर्यंत कोणतेही प्रशासकीय अधिकारी घटनास्थळावर आले नव्हते.
गावालगत बाभळी , ग्रा.प.सदस्यांना.विश्वासात न घेता विकून टाकून पैशाची अफरातफर केल्याचा आरोप तसेच फिल्टर प्लांट चे बिल न भरल्यामुळे जल जीवन मिशन चे तीन तेरा वाजले असून गावाला पाणीपुरवठा बंद आहे.पाण्यापासून ग्रामस्थ वंचित आहे.या सर्व भोंगळ कारभाराची सखोल चौकशी करुन दोषिवर कारवाही करावी अशी मागणी उपसरपंच अनिल आत्राम, ग्रा.प.सदस्य नमोद कोंगरे,शालू मडावी, सुवर्णा माथनकर,सामाजिक कार्यकर्ते संदीप विधाते यांनी केली आहे.
