#Ghugus
• आर.टी.ओ.कार्यालय व लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशन,घुग्घुस यांच्या वतीने वृक्षारोपण कऱण्यात आले
सुवर्ण भारत: पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
चंद्रपूर : प्रादेशिक परिवहन कार्यालय (आर.टी.ओ.) व लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशन,घुग्घुस यांच्या वतीने येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात (आर.टी.ओ.)प्रादेशिक परिवहन कार्यालय अधिकारी किरण मोरे,लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे युनिट हेड वाय.जि.एस प्रसाद,वरिष्ठ उपाध्यक्ष श्री प्रशांत पुरी, सहाय्यक महाप्रबंधक विद्या पाल आणि प्रादेशिक परिवहन येथील अधिकारी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी वृक्षारोपणाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, “वृक्ष हे पृथ्वीवरील जीवनाचे आधारस्तंभ आहेत. वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे आणि यावर मात करण्यासाठी अधिकाधिक झाडे लावणे आवश्यक आहे.”
प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात विविध प्रकारच्या देशी झाडांची रोपे लावण्यात आली. त्याचप्रमाणे लॉयड्स इन्फिनाईट फॉउंडेशन अंतर्गत (आर.टी.ओ.) परिसरात फळ,फुल वृक्ष लागवड चे संपूर्ण काम करून देण्यात येत आहे तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच, या झाडांचे संगोपन करण्याची आणि भविष्यातही अशाच प्रकारचे उपक्रम राबवण्याची ग्वाही यावेळी देण्यात आली.
या कार्यक्रमामुळे पर्यावरणाविषयी जनजागृती झाली असून, नागरिकांनीही आपापल्या परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. कर्यक्रमाचे संचालन प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी शिवाजी विभुते यांनी केले तर आभार दिपक साळवे यांनी म्हणाले कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी अनुराग मत्ते व रमण पानपट्टे यांनी प्रयत्न केले.
