
आ.जोरगेवार जनसंपर्क कार्यालयात अहमदाबाद भीषण विमान व हेलिकॉप्टर अपघाताना दिली भावपूर्ण श्रध्दांजली
घुग्घुस : भारतीय जनता पक्ष व आ.किशोर जोरगेवार जनसंपर्क कार्यालयात आ.जोरगेवार यांच्या सूचनेनुसार सामाजिक नेते आशीष मासिरकर यांच्या नेतृत्वात अहमदाबाद भीषण विमान व केदारनाथ हेलिकॉप्टरने अपघातात मृत्यु पावलेल्या नागरिकांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आले.
अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रवासी व वणी येथील जयस्वाल परिवार यांच्या केदारनाथ येथे हेलिकॉप्टर अपघातात दुर्दैवी मृत्यु घटनेमुळे संपूर्ण देश शोकसागरास बुडाला आहे.
मृत्युमुखी व जयस्वाल परिवार च्या आत्म्याच्या शांततेसाठी दोन मिनिट शांतता ठेवली गेली.
ईश्वर या सर्व दिवंगत आत्म्यांना शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबायांना या दुःखद प्रसंगी धैर्य देवो हीच प्रार्थंना करण्यात आली.
याप्रसंगी आशिष मासिरकर,संतोष नूने,साजन गोहणे,सुचिता लुटे,पूजा दुर्गम,श्याम आगदारी,स्वप्निल वाढई,
संतोष लोढे, राजू सूर्यवंशी,इरशाद,प्रकाश नगले,विक्की सोदारी,राकेश कैथल,विशाल अडूर,सुनीता पाटील,मुक्ता धाबेकर,जयश्री राजुरकर,सुरेखा तोडासे,भारती सोदारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
