#Varora
• प्रा. गोपाल वरुटकर यांना गोंडवाना विद्यापीठाकडून आचार्य पदवी (Ph.D) बहाल
सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनिधी, वरोरा

वरोराः – प्रा. गोपाल नारायण वरुटकर, आनंद निकेतन कॉलेज ऑफ सायन्स, आर्ट्स अँड कॉमर्स, वरोरा येथील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक ,यांनी त्यांच्या उल्लेखनीय संशोधन कार्याबद्दल गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून विज्ञान व तंत्रज्ञान शाखेत डॉक्टरेट (Ph.D.) पदवी प्राप्त केली आहे.
SYNTHESIS AND CHARACTERIZATION OF VANADATE BASED PHOSPHORS FOR OPTICAL APPLICATIONS” हा त्यांचा संशोधनाचा विषय होता ज्यात त्यांनी व्हॅनेडेट-आधारित नवीन प्रकाश उत्सर्जक (फॉस्फर) विकसित करुन त्यांचा उपयोग LED, लेझर तंत्रज्ञान व इतर फोटोनिक प्रणालींमध्ये कसा होऊ शकतो,ह्याचा अभ्यास केला.
या संशोधन काळात डॉ. वरुटकर यांनी Elsevier, Springer, American Institute of Physics, आणि Taylor & Francis या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय प्रकाशन गृहांतर्गत ७ महत्त्वपूर्ण संशोधन पेपर्स प्रकाशित केले.
आपल्या यशाबद्दल आभार व्यक्त करताना, डॉ. वरुटकर यांनी MSS व्यवस्थापन, प्राचार्य व IHLR & SS (Institute of Higher Learning & Research and Specialized Studies) ह्यांचे सतत सहकार्य व सुविधा या बद्दल विशेष धन्यवाद केले.
त्यांनी मार्गदर्शक डॉ. निलेश उगेमुगे यांच्या अथक पाठिंबा, तर्कपूर्ण मार्गदर्शन व सातत्यपूर्ण प्रेरणेबद्दल उपकार व्यक्त केले. तसेच, मेंटर डॉ. एस. व्ही. मोहरिल यांना या संपूर्ण प्रवासातील मुख्य आधार म्हणून मानले.
शेवटी, त्यांनी त्यांचे सहकारी , मित्र आणि कुटुंबीयांनी दिलेल्या मदतीबद्दलही कृतज्ञता व्यक्त केली.
