Home Breaking News • रस्त्यावरील जलतांडवाचा निषेध भास्कर लोहब्बडे यांनी पाण्यात उतरून आंदोलनाचा इशारा ...

• रस्त्यावरील जलतांडवाचा निषेध भास्कर लोहब्बडे यांनी पाण्यात उतरून आंदोलनाचा इशारा • शिवाजी चौक-नांदा फाटा

160

• रस्त्यावरील जलतांडवाचा निषेध भास्कर लोहब्बडे यांनी पाण्यात उतरून आंदोलनाचा इशारा

• शिवाजी चौक-नांदा फाटा

सुवर्ण भारत: रविकुमार बंडीवार

गडचांदुर:शहरातील खराब रस्ते आणि पावसाचे पाणी साचून निर्माण झालेली दयनीय परिस्थिती लक्षात घेता, नागरिक आता स्वतःच रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त करत आहेत. आज भास्कर भाऊ लोहब्बडे यांनी थेट रस्त्याच्या मधोमध साचलेल्या पाण्यात उभे राहत अनोख्या पद्धतीने आंदोलनाचा इशारा दिला.

यावेळी त्यांनी प्रशासनाच्या दुर्लक्षाचा तीव्र निषेध करत म्हटले की, “दरवर्षी पावसाळा आला की हाच त्रास. पाणी साचते, अपघात होतात, नागरिक त्रस्त होतात, पण कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नाही.”

घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी झाली होती. स्थानिक नागरिक आणि दुकानदारांनीही भास्कर भाऊंच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. नागरिकांनी पालिकेवर टीका करत सांगितले की, “अनेक वेळा तक्रारी करूनही रस्त्यांचे डागडुजीचे काम होत नाही. आम्हाला पावसाळ्यात अक्षरशः पाण्यातून चालावे लागते.”

या आंदोलनामुळे प्रशासनाचे लक्ष वेधले जाईल का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सध्या तरी नागरिक एकच मागणी करत आहेत – “आम्हाला मूलभूत सुविधा द्या!”