#Ballarpur
• बल्लारपूर वाहतूक पोलिसानी भोजनालयात अवैध दारू विक्रेत्यांवर केले कारवाई
सुवर्ण भारत: शंकर महाकाली (संपादक)

बल्लारपूर : कोठारी हायवे रोडवरील केबिन बॉडी वर्कशॉप समोर भोजनालयात अवैध दारू ची विक्री होत असल्याची माहिती बल्लारपूर चे पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांना मिळाली. बल्लारपूर वाहतूक पोलिसांना कारवाई करण्याचे निर्देश पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे दिले.वाहतूक पोलिसानीं गणेश भोजनालय येथे धाड टाकून अवैध दारू जप्त केले.
भोजनालयाची झडती घेतली असता एका कापडी थैलीत २ नग इम्पेरियल ब्लू कंपनीची विदेशी दारू १८० एम.एल ने भरलेली किमत ३४० रुपये, १ नग इम्पेरियल ब्लू कंपनीची विदेशी दारू ९० एम.एल ने भरलेली किंमत ९० रुपये, ९ नग रॉकेट संत्रा देशी दारू ९० एम. एल ने भरलेली किंमत ३६० रुपये, ४ नग बडीशेप देशी दारू ९० एम एल ने भरलेली किंमत १४० रुपये असा एकूण ९३० रुपयाचा माल मिळून आल्याने बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे अप क्रं ४६४/२०२५ कलम ६५( इ) मदाका अन्वये गुन्हा नोंद केला आहे.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक बीपीन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गजानन डोईफोडे, गजानन झाडे, राजू बगमारे, अजय खरकाटे, प्रणय वानखडे, स्वप्निल खोब्रागडे, शाहरुख खान संदेश देवगडे, राहुल धूडसे यांनी केले.


