*:::: ⬜माझा महाराष्ट्र⬜ ::::*

सुवर्ण भारत : किरण घाटे
विदर्भ विशेष प्रतिनिधी
माझी महाराष्ट्र भूमी
असे संतांचे आगर
मानवतेची शिकवण
अमृतवाणीचा सागर…. १
उभा विश्वाला भूषण
तुकोबा ज्ञानोबा माऊली
स्वराज्य स्थापिले ज्यांनी
अशा शिवबाची मिळे सावली… २
दिली प्राणांची आहुती
केली भूमी ही पावन
स्वातंत्र्य देऊन आम्हा
कृतार्थ केले हे जीवन…. ३
एकोप्याने बंधूभावाने
सर्वधर्मीय इथे राहती
गुण्यागोविंदाने भूमीत
प्रेमभावे आपुलकीने नांदती… ४
झिजूनी असंख्य वीरांनी
भूमीसाठी दिले प्राण
आदर्श माझा महाराष्ट्र
करीते त्याला मी वंदन….. ५
🟧सौ. ऋचा हनुमंत महाबळ
⬜सिंधुदुर्ग⬜
🟥सहज सुचलं काव्यकुंज सदस्य
