शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी टेमूर्डा येथे महामार्गावर बैलबंडी सोडून रस्तारोको आंदोलन
सुवर्ण भारत : खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनिधी, चंद्रपूर
*वरोरा* : बच्चू कडू यांनी राज्यभर पुकारलेल्या रस्तारोको आंदोलन यशस्वी करण्यासाठी वरोरा तालुक्याचे शेतकरी नेते तथा सामाजिक कार्यकर्ते किशोर डुकरे यांच्या नेतृत्वात टेमुर्डा महामार्गावर रस्त्यावर बैलबंडी सोडून सकाळी सुमारे एक तास चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास जिल्हातून मोठया प्रमाणात शेतकरी आले. शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या मध्ये शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा. शेतमालाला वीस टक्के वाढ तसेच अपंगाना सहा हजार रूपये मानधन देण्यात यावे याआदींचा समावेश आहे. मागील अनेक दिवसांपासून शेतकरी, शेतमजूर, मच्छीमार मेंढपाळ, दिव्यांग, विधवा महिला आदीच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर आंदोलन सुरू आहे सरकारने याकडे दुर्लक्ष केल्याने बच्चन कडू अधिक आक्रमकतेने या मुद्द्यावर लढा देत आहेत.बच्चू कडूंनी राज्यभर पुकारलेल्या रास्तारोको आंदोलन यशस्वी करण्यासाठी टेमुर्डा येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी दहा ते पंधरा आंदोलन कर्त्याला ताब्यात घेऊन नंतर सुटका केली. यावेळी किशोर डुकरे यांच्यासह गणेश उराडे, मनोज काळे, उमेश टोंगे,संदिप वासेकर, विकास डुकरे, ईश्वर मगरे, तुलसी आलम, मोहित हिवरकर, अमित बहादूरे, आशिष रणदिवे, आशिष जांभुळे ,रमेश महाकालकर, आदर्श घेगारे, प्रशांत मेश्राम आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
